मुख्य सामग्रीवर वगळा

*इंदापूर तालुक्यातील रामवाडी वडापुरी येथील तात्यासाहेब फडतरे व सौ. सरोजिनी फडतरे या दापत्याने बनवलेली भारतातील पहिली लोकल ज्वारीची इडली झाली ग्लोबल*,


इंदापूर, डॉ. संदेश शहा.
इंदापूर तालुक्यातील रामवाडी - वडापुरी येथील तात्यासाहेब फडतरे यांनी तेरा वर्षापूर्वी ४६ हजार रुपयांच्या पगाराची नोकरी सोडून काहीतरी वेगळे करायचे म्हणून भरड धान्य उत्पादन व प्रकिया उद्योग सुरु केला. त्यावेळी त्यांची अनेकांनी चेष्टा केली, त्यांना अव्यवहारी म्हटले मात्र आता लोकल टू ग्लोबल अंतर्गत ' गुड टू इट ' या ब्रँड व्दारे त्यांच्या ज्वारी व इतर ४५ हून जास्त उत्पादनाने जागतिक बाजारपेठेत घेतलेली गरुड भरारी पाहून अनेक जण त्यांच्या मेहनतीस उस्फुर्त दाद देत आहेत, त्यांचा आदर्श घेत आहेत. त्यांना नावे ठेवणारे आता त्यांचे गोडवे गात आहेत !
ज्वारी हे महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील प्रमुख पीक असून राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ज्वारीचे पीक घेतले जाते. मात्र आपल्या आहारात पौष्टिक, आरोग्यदायी ज्वारीच्या भाकरीचे प्रमाण कमी झाले आहे. आपला देश मधुमेह या आजाराची राजधानी झाली आहे तर कॅन्सर ची राजधानी होवू पहात आहे. लकवा
, थायरॉईड, शुक्रधातू कमतरता, मुल बाळ न होणे यासारख्या विविध समस्या वाढत असून दिवसेंदिवस आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी कमी होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर तात्यासाहेब फडतरे तसेच सौ. सरोजिनी फडतरे यांचे स्टार्ट अप अनेकांना प्रेरणादायी, आरोग्यदायी, वरदान ठरले आहे. 
 तात्यासाहेब फडतरे हे एका संस्थेत कृषी विभागात उपसंपादक म्हणून नोकरीवर काम करत होते. त्यानंतर त्यांनी ४६ हजार रुपये पगाराच्या नोकरीवर पाणी सोडून पत्नी सरोजिनी फडतरे या सन २०१० पासून ज्वारी, बाजरी, गहू पासून पीठ, बनविण्याचे काम करत होत्या, त्यास मदत करण्यास सुरुवात केली. सौ. फडतरे यांनी धान्यापासून तयार केलेले पदार्थ विक्री साठी नेवून देत ते त्यांना मदत करत होते. सन २०१२ मध्ये शरद पवार साहेब हे केंद्रात कृषी मंत्री असताना भरड धान्य विकास कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यावेळी मात्र कृषी विभागातील श्रीमती बाणखिले मॅडम, श्री. बोरकर, श्री. हांडे तसेच कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर यांनी तात्यासाहेब यांना प्रेरणा दिली. तात्यासाहेबांचे वडिल यांचे कॅन्सरने निधन झाल्यामुळे त्यांच्याही मनात वेगळं काही करण्याची इच्छा होती. नंतर तात्यासाहेब यांनी राजीनामा देवून पत्नी सौ. सरोजिनी यांच्या समवेत मिलेट्स प्रक्रिया उद्योग सुरू केला. त्या अंतर्गत ज्वारीची पहिले इडली मिक्स २०१२ मध्ये या दापत्याने तयार केले. त्यानंतर ज्वारीचे आहारातील प्रमाण वाढावे यासाठी त्यांनी ज्वारी पासून पोहे, रवा, लाडू, चिवडा असे पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. फडतरे दाम्पत्य यांनी १४ वर्षां पासून मिलेट्स प्रक्रिया उद्योगामध्ये काम करत ज्वारीच्या पिठापासून प्रक्रिया उद्योग नियोजनबध्द पद्धतीने वाढवला. मिलेट्सचे येणाऱ्या काळातील महत्त्व लक्षात घेता त्यांनी ज्वारीवर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार करायला सुरूवात केली. लोकांना बाजारात मिळणाऱ्या इतर उत्पादनाच्या तुलनेत ज्वारी उत्पादनांची चव आवडत नव्हती. त्यामुळे लोकांच्या दैनंदिन आहारातील चवदार पदार्थ ज्वारी पासून बनवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 
नाष्टा म्हणून अनेक लोक इडली ला प्राधान्य देतात त्यामुळे ज्वारी पासून इडली बनवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्या अगोदर हैद्राबाद येथील ज्वारी संशोधन केंद्रा कडून ज्वारीपासून इडली बनवण्याचे काम सुरू होते. पण या इडली मिक्स मध्ये तांदळाचे पीठ होते. पण फडतरे यांनी केवळ ज्वारी पासून इडली मिक्स तयार केले आणि ते लोकांच्या पसंतीस उतरले. फक्त ज्वारी पासून इडली बनवण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला. त्यांनी बनवलेली इडली ही देशातील पहिलीच ज्वारीची इडली मिक्स ठरले.
त्यानंतर डॉ. शंकरराव मगर यांच्या अध्यक्षते खाली तात्यासाहेब हे सचिव झाले. त्यांनी वीस जणांचा आत्मा अंतर्गत गट सुरू करून ज्वारी वर प्राथमिक प्रकिया करण्याचा कारखाना रामवाडी - वडापुरी हद्दीत सुरू केला. साधारण २०१२ साली तयार झालेल्या या उत्पादनाने आता जगभरात नाव कमावले आहे. या उद्योगासाठी त्यांनी बँकेस २२ ते २४ लाख रुपयांचे कर्ज मागितले होते मात्र ते नामंजूर झाले. त्यानंतर त्यांनी जिव्हाळ्याच्या सर्व शक्ती एकत्र करून या प्रक्रिया उद्योगात मित्र, स्नेही यांचेकडून भांडवल उभा करून समृध्दी ऍग्रो ग्रुप ही संस्था अहील्यानगर येथील राहुरी तालुक्यात देवळाली प्रवरा येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभी केली. फडतरे यांच्या 'गुड टू इट' या ब्रँड खाली जवळपास ४० ते ४५ उत्पादने आता विक्री केले जातात. यामध्ये ज्वारी पासून इ़डली मिक्स, ज्वारीचा रवा, ज्वारीचे पोहे, ज्वारीचा चिवडा, पॅनकेक , नाचणी सत्त्व, ज्वारी सत्त्व तसेच बाजरी, नाचणी या धान्यापासून बनवलेले विविध पदार्थांचा समावेश आहे. त्यांनी प्रथम नेदरलँड, बेल्झियम, लांकॅस्टर, त्यानंतर दुबई येथे उत्पादने पाठविण्यास सुरुवात केली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर , कॅनडा, न्यूझीलंड येथे देखील त्यांची उत्पादने जात आहेत. जगातील उपरोक्त देशांमध्ये या विविध उत्पादनांची निर्यात वाढत असून आता आफ्रिकेमध्ये उत्पादने निर्यात करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्यांच्या या व्यवसायाची उलाढाल आता अडीच कोटींच्या घरात पोहोचली आहे.
त्यांनी बनविलेली इडली, डोसा पीठ व रवा या पदार्थांसह विविध पदार्थ हे ग्लूटेन फ्री असल्याने ते आरोग्य दायी असल्याने या पदार्थांना चांगली मागणी आहे. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षामध्ये त्यांचा व्यवसाय उत्तरोत्तर वाढला. विविध आजारांवर संतुलित आहार हे रामबाण औषध असल्याने त्यांचे
 ग्लूटेन फ्री पदार्थ आता चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे अनेक आजारांना देखील प्रतिबंध होत असून अनेक आजार सुसह्य होत आहेत. या प्रक्रिये साठी ते पुणे, सोलापूर भागातील शेतकऱ्या कडून ज्वारी, बाजरी तर अकोले, कोल्हापूर आणि नाशिक येथील शेतकऱ्यांकडून नाचणीची खरेदी करतात. शेतकऱ्यांना योग्य दर दिला जातो तसेच वाहतुकीचा खर्च देखील ते स्वतःच करतात. त्यांनी प्रथम पुण्यातील विविध सोसायट्यांमध्ये पदार्थांचे सॅंपल म्हणून मोफत वाटप केले. त्यास मिळालेल्या प्रतिसादानंतर आणि ग्राहकांनी दिलेल्या प्रतिक्रिया वर विचार करून त्यांनी पुण्यामध्ये वितरणाची व्यवस्था विकसित केली. आज मितीस पुण्यामध्ये १६३ ठिकाणी ज्वारीचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय मुंबई, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, अकोला इत्यादी ठिकाणी त्यांच्या उत्पादनांची विक्री होत असून महाराष्ट्राबाहेर एकूण अकरा ठिकाणी त्यांच्या पदार्थांची विक्री होत आहे.
त्यांनी प्रथम नेदरलॅंड देशामध्ये पदार्थांची निर्यात सुरू केली असून लवकरच साता समुद्रापार दक्षिण आफ्रिकेत निर्यातीचे नियोजन करण्यात आले आहे. अमेरिका, दुबई, स्पेन,ऑस्ट्रेलिया, कॅनडा देशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी त्यांचे नातेवाईक ज्वारी, बाजरी, नाचणीचे पदार्थ आवर्जून घेऊन जात असल्याने परदेशात त्यांच्या पदार्थांची लोकप्रियता वाढली आहे. त्यांचे उत्पादित पदार्थ यांना संपूर्ण राज्यभरातून मागणी वाढल्यामुळे दोराबजी, राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र, डायबेटिक ट्रॉमा सेंटर मध्ये ज्वारीचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परराज्यांतून मागणी वाढल्याने कुरिअर द्वारे माल पाठविला जात आहे.
पदार्थांची ‘गुड टू इट’ या ब्रँड च्या नावाने ऑनलाइन विक्री होत असल्याने त्यांनी त्यासाठी वेबसाइट तयार केली आहे.
प्रकल्पामध्ये सध्या नऊ मजूर असून पदार्थांच्या वितरणासाठी स्वतंत्र टीम कार्यरत आहे. शहरातील नागरिकांना ज्वारी, बाजरी आणि नाचणीचे महत्त्व कळावे यासाठी ते जनजागृतीचे विविध कार्यक्रम देखील आयोजित करत आहेत. विविध ठिकाणी होणाऱ्या प्रदर्शनात ते पदार्थांचे मोफत वाटप करतात. 
सुरवातीस प्रक्रिया उद्योगाची वार्षिक उलाढाल ३० ते ३५ लाखांपर्यंत होती मात्र आता एक तपानंतर ती अडीच कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. उद्योग विकासामध्ये त्यांची पत्नी सरोजिनी आणि कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. प्रक्रिया उद्योगा तील प्रगतीमुळे तात्यासाहेब फडतरे यांना सर्वप्रथम सह्याद्री वाहिनी चा पुरस्कार मिळाला. त्यांच्या अनमोल कार्याची दखल घेवून शासनाने त्यांना दोन पुरस्कार तसेच खासगी संस्थांनी देखील पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. विशेष म्हणजे राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तात्यासाहेब व सौ. सरोजिनी फडतरे यांना राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा मिलेट उद्योजक म्हणून पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मिलेट थेरापीचे जनक डॉ. खादिर वली यांनी देखील त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे. विशेष म्हणजे गेल्या दिवाळी पाडव्याला कॅनडा येथे जागृती राणे यांच्या मदतीने विंडसर येथे संस्थेचे ऑफिस सूरू करण्यात आले आहे. या ऑफिस मधून तेथील भारतीय नागरिकांना पारंपरिक पद्धतीने बनविलेले पौष्टिक पदार्थ की ज्यामध्ये कोणतेही रासायनिक संरक्षक न टाकता जास्त टिकवण क्षमता असलेले अनेक पदार्थ देण्यात येत आहेत. आरोग्यासाठी ते उपयुक्त असल्याने त्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे साता समुद्रापार इंदापूर तालुक्याचे नाव पोहोचले असून त्यामुळे तालुक्याचा नावलौकिक उंचावला आहे.  
यासंदर्भात तात्यासाहेब फडतरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आपला देश कृषीप्रधान देश असून देशाची अर्थव्यवस्था शेती वर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या युवा पिढीने नोकरीच्या मागे न लागता शेती पूरक व्यवसाय म्हणून मिलेट उत्पादन प्रक्रिया उद्योग सुरू करणे गरजेचे आहे. मात्र एकदम भांडवल न गुंतविता टप्पाटप्प्याने भांडवल गुंतवून प्रकिया उद्योग विकसित करणे गरजेचे आहे. या व्यवसायात मोठे भवितव्य आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...