मूकबधिर निवासी शाळा इंदापूरशाळेची विद्यार्थिनी कुमारी साक्षी धनाजी पाटील हिचा गोळा फेक या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक
इंदापूर: समाज कल्याण विभाग, पुणे जिल्हा परिषद, पुणे आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांग शालेय क्रीडा स्पर्धा सन 2024- 25 मूकबधिर निवासी शाळा इंदापूर जिल्हा पुणे, या शाळेची विद्यार्थिनी कुमारी साक्षी धनाजी पाटील हिचा गोळा फेक या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल तिचे शाळेच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन जिल्हा परिषद पुणे यांचे तर्फे आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांगाच्या क्रीडा स्पर्धा पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये 82 शाळातील 465 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यात इंदापूर येथील मूकबधिर निवासी शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी शाळेची विद्यार्थिनी तिचा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक आल्याने निवड झाली आहे गोळा फेक या प्रकारांमध्ये सदर विद्यार्थ्यांचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे शाळेतील एकूण 14 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते त्यापैकी सर्व विद्यार्थ्यांनी चांगले कामगिरी केले आहे या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर व अमोल उन्हाळे सर यांनी शाळेतील सर्व कर्मचारी क्रीडा शिक्षक यांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले,
टिप्पण्या