सैनिक दलाच्या वतीने, २६ नोव्हेंबर "संविधान दिन" एक अनोख्या पद्धतीने साजरा- अशोकराव पोळ इंदापूर:- दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ ते ०१ या वेळेत समता सैनिक दल, या राष्ट्रीय सामाजिक मातृसंघटनेच्या वतिने सर्व समता सैनिकांनी व पदाअधिकाऱ्यांनी सालाबाद प्रमाणे २६ नोव्हेंबर "संविधान दिन" एक अनोख्या पद्धतीने साजरा केला. या संविधान दिनाचे औचित्य साधुन इंदापूर नगरपरिषदेसमोरील छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन करुन इंदापूर शहरातील मध्यभागी असलेला खडकपुरा चौकामधील संविधान स्तंभाला फुलांच्या माळांने सजवुन त्याठिकाणी उ्द्देशीकेच्या वाचनासह जयघोष करण्यात आला. इंदापूर तालूका तहसील कार्यालय, इंदापूर पोलीस स्टेशन, इंदापूर पंचायत समिती आणि इंदापूर नगरपालिका या शासकीय कार्यालयामध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन करून त्या त्या विभागांच्या प्रमुखांच्या उपस्थित संविधानाची उद्देशीकेचा फोटो कार्यालयामध्ये समोर दर्शनीभागावर लावण्यासाठी १८ × २० आकाराचे फ्रेमसह...
SHIVSRUSTHI NEWS