मुख्य सामग्रीवर वगळा

जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रच्या वतीने ग्रामीण महिला महामेळावा

 इंदापूर:- जिजाऊ ब्रिगेड तर्फे -स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला,महिलांना रोजगारातील संधी उपलब्ध व्हाव्यात, बचत गटांचे महत्त्व कळावे,स्वतःच्या वस्तूला योग्य तो दाम मिळावा या हेतूने जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र तर्फे रोजगार स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन समृद्धी गार्डन,यवत तालुका,दौंड,जिल्हा पुणे ठिकाणी येथे यशस्वीरित्या संपन्न झाला 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे,प्रमुख मार्गदर्शक प्रदेश महासचिव स्नेहा खेडेकर,कार्याध्यक्ष नंदा शिंदे,जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष जयश्री गटकुळ, आम्रपाली धिवार,वैशाली नागवडे, निशा शेंडगे, रझिया तांबोळी, प्रा.डॉ. अंजली कदम, संजय व्यायाळ व वैशाली व्यायाळ, महेश पासलकर, वीरधवल जगदाळे,  नितीन दोरगे, गणेश कदम,रोहन दोरगे, सरपंच समीर दोरगे, प्रा.सुधाकर फुले, जिजाऊ ब्रिगेड पंढरपूर विभाग अध्यक्षा सुरजाताई  बोबडे, जगदीश ओहोळ,अमर हजारे, बिभीषण गदादे, शोभा जगताप,पिंपरी महानगरप्रमुख स्मिता म्हसकर, हवेली तालुकाध्यक्ष सुनीता गरड,बारामतीच्या अध्यक्ष विद्या चव्हाण चव्हाण,रश्मी सातपुते,विजयालक्ष्मी आळेगी,इंदापूर तालुका कार्याध्यक्ष राधिका शेळके,यवत जिजाऊ ब्रिगेडच्या उर्मिला दोरगे,पुष्पा खेडेकर,छाया चोबे,ईशा दोरगे,पुरंदर तालुकाध्यक्ष दुर्गा उरसळ, दौंड तालुका अध्यक्ष सारिका भुजबळ, मुळशी तालुकाध्यक्ष सायली शिंदे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली.जिजाऊ ब्रिगेड प्रदेश कार्याध्यक्ष नंदा शिंदे व पुणे जिल्हाध्यक्ष प्रा.जयश्री गटकुळ यांनी जिजाऊ वंदना गायन केली.
 प्रास्ताविकातून जिजाऊ ब्रिगेड प्रदेश महासचिव स्नेहा खेडेकर यांनी महिलांनी चुल व मुल यात न अडकता बाह्य जगातील उद्योग व्यवसायात संधी शोधल्या पाहिजेत. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतील तरुणींनी उद्योजक यांनी उद्योग व्यवसायातील तंत्र व मंत्र आत्मसात करणे गरजेचे आहे यासाठी झोकून घ्यावे असे सांगत जिजाऊ ब्रिगेडतर्फे भविष्यकाळात विविध प्रक्रिया उद्योगांवर भर देण्यासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले.
जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्ष नंदा शिंदे यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या वाटचाल सांगताना गाव-खेड्यावर काम करणारी व महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणारी जिजाऊ ब्रिगेड ही देशातील मोठी संघटना आहे.यात सहभागी होऊन आपल्या न्याय हक्कांसाठी लढा द्यावा असे सांगितले. एस.एन.डी.टी.कला व आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रा. अंजली कदम -नारायणे यांनी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाल्याशिवाय महिला स्वयंपूर्ण होणार नाहीत यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी बचतगटांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. छोटे-मोठे उद्योगाला सुरुवात करून त्यातील कौशल्य आत्मसात करावे व विविध भागातील उद्योगाच्या संधी शोधाव्यात असे आवाहन केले.उद्योग व्यवसाय प्रशिक्षक प्रा.सुधाकर फुले यांनी शासनाचे विविध उद्योग व्यवसाय त्यासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानांची तसेच कर्ज योजनांची माहिती दिली.शासकीय महामंडळाच्या विविध योजना महिला बचत गट उद्योग व्यवसाय गट उभारणी व मार्केटिंग कौशल्य आत्मसात केल्यास महिला उंच भरारी घेऊ शकतील असा विश्वास व्यक्त केला. यासाठी महिलांनी उद्योगातील सातत्य आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
सुप्रसिद्ध उद्योजक 
ईश्वेद बायोटेक कंपनीचे डायरेक्टर संजय वायाळ यांनी स्वतः उभारलेल्या उद्योग व्यवसायाची निर्मिती करताना  मी शून्यातून उद्योगाची भरारी घेतली आहे.असे मत व्यक्त केले उद्योग व्यवसायात चढ-उतार सुरू असतात मात्र आपण खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असल्याचे सांगितले.
प्रसिद्ध उद्योजिका कमलताई परदेशी यांनी गाव खेड्यावर जिजाऊ ब्रिगेड महिलांना उद्योग व्यवसाय कौशल्य प्रशिक्षण देत आहेत जगदीश अमर हजारे, बिभिशन गदादे,अमर हजारे यांनी विविध उद्योगातील संधी,कृषी पूरक उद्योग मार्केटिंग कौशल्य उद्योजकातील मानसिकता आणि यशस्वितेबाबत मार्गदर्शन केले.
 अध्यक्षीय भाषणातून जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांनी राज्यभरात सामाजिक, राजकीय,उद्योजक क्षेत्रात महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडची वाटचाल सुरू आहे. असे मत व्यक्त केले . कर्तबगार महिला आणि सामजिक कार्यकर्त्यांचा मानचिन्ह, शाल देऊन सन्मान करण्यात आला. तहसीलदार संजय पाटील,पोलीस निरीक्षक नारायण पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या दौंड तालुकाध्यक्ष सारिका भुजबळ व भरत भुजबळ  समृध्दी गार्डन लॉन्सचे विश्वस्त संजय शहा,बाशिर शेख,प्रशांत दिवेकर यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती भदाणे यांनी केले आभार जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्ष सारिका भुजबळ यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...