श्री.संत गुलाबबाबा मंदिर धामाच्या विकास कामासाठी आणि भक्तांच्या सेवेसाठी तत्पर - नूतन अध्यक्ष नरेंद्र पालांदुरकर
श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेलच्या
संचालक मंडळाची बिनविरोध निवड,मावळते अध्यक्ष सोनूमामा भाटिया यांनी दिले नूतन संचालक मंडळाला आशीर्वाद
इंदापूर:-श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेल येथे २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी नवनियुक्त संचालक मंडळाची बिन विरोध निवड झाली.बुलढाणा जिल्ह्यातील काटेल धाम हे गाव म्हणजे श्री संत गुलाब बाबांची कर्मभूमी असून हे काटेल गाव म्हणजे ते गाव होय, ज्याची सद्गुरु गुलाब बाबांनी निवास करण्यासाठी स्वतः निवड केली. सन १९५८ नंतर सद्गुरु गुलाब बाबांचा सगळ्यात जास्त जिथे सहवास राहिला ते गाव म्हणजे काटेल धाम होय.
काटेल गावातील आश्रमात सद्गुरु गुलाब बाबांचे खरे निवास स्थान म्हणजे झोपडी, बाबाजींनी भक्तांच्या दुःख निवारणासाठी स्वतः खोदलेले चमत्कारी अमृतकुंड, कचेरी नदीचा अद्भुत घाट ज्या ठिकाणी बाबजींनी दीन- दुबळ्या भोळ्या भक्तांसोबत दहीहंडी उत्सव साजरा केला व गोपाळ काला गोड केला. तसेच सद्गुरु गुलाब बाबाजींच्या अमृतवानीने दुमदुअमलेला असंख्य भजन - कीर्तनाचा साक्षी असलेला साई-सभामंडप, सद्गुरु गुलाब बाबांचे भव्य दिव्य मंदिर, तीन औदुंबर, पाच औदुंबर आणि अनेक मंदिरांनी साजेलेले हे काटेल आश्रम एकूण ५६ एकरात विस्तारले आहे.
नव- नियुक्त विश्वस्त मंडळ हे काटेल आश्रमाच्या विकासासाठी बांधील राहील आणि नक्कीच श्री संत गुलाब बाबांच्या काटेल आश्रमाचे नंदनवन करण्यासाठी एका नव्या उर्मिने, नव्या जोशाने काम करणार असल्याचे नूतन अध्यक्ष नरेंद्र पालांदुरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले की,काटेल येथील श्री संत गुलाब बाबांचे भव्य मंदिराचे काम सन २०२५ पर्यंत पूर्ण करणे, काटेल येथे भक्तांसाठी नवीन भव्य भक्तनिवास उभारणे, काटेल आश्रमाचे सुशोभीकरण करणे, नवीन व उत्कृष्ठ भोजनगृह निर्माण करणे तसेच काटेल येथे येणाऱ्या भक्तांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी काम करणार.
तसेच सद्गुरु श्री संत गुलाब बाबांच्या जन्म शताब्दी वर्ष म्हणजे सन २०३२ पर्यंत संकल्पक वृत्तीने नवनियुक्त संचालक मंडळ काम करणार.सद्गुरु गुलाब बाबांचा आशिर्वाद व भक्तमंडळीचे प्रेम असेच सदैव टिकून राहिले ते निश्चितच येणाऱ्या पाच वर्षात काटेल आश्रमाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले.
*नवनियुक्त संचालक मंडळ पदाधिकारी पुढील प्रमाणे*
मुख्य मार्गदर्शक- सोनुमामा भाटिया,नरेंद्र बबनराव पालांदुरकर,(भंडारा)
नूतन अध्यक्ष, मिलिंद वामन खेर्डीकर,(औरंगाबाद) सदस्य, धनंजय शिवराम घाग, (मुंबई)सचिव, बाजीराव भास्कर भाटिया, (सोनवद)सदस्य, मनोहर महादेव कुकडे, (काटेल)सदस्य, अरुण मथुरादास भाटिया, (धरणगाव)सदस्य, विठ्ठल पुंडलिक टाकळकर, (दानापूर)सदस्य, नरहरी गुलाबराव आढाव, (काकणवाडा)सदस्य, ध्रुव डाबेराव(कोलद)सदस्य,
गजानन श्रीराम खडसे, (काटेल)सदस्य,दिगंबर सारंगधर कुकडे, (काटेल)सदस्य, रवींद्र सहादू पाटील, (धुळे)
सदस्य, बाबासाहेब एकनाथ मांडलिक, (सोनई)सदस्य, भाईदास भगवान पाटील, (नंदुरबार)सदस्य
----------------
टिप्पण्या