मा.ना.दत्तात्रय भरणे यांच्यामुळे चाँदशावली बाबा दर्ग्याच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरू- श्रीधर बाब्रस मा.नगरसेवक
इंदापूर:- मा.राज्यमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.प्रदीपदादा गारटकर यांनी मागील आठवड्यामध्ये दर्ग्यास भेट देऊन मा.ना.दत्तात्रय भरणे यांनी मुख्याधिकारी श्री.राम कापरे यांना फोन केला. दुसऱ्याच दिवशी हजरत चाँदशावली दर्गा कमिटीचे सदस्यांनी कामासंदर्भात अडीअडचणी सांगितल्यानंतर मुख्याधिकारी साहेबानी दर्गा परिसर स्वच्छ करण्यास व तेथील बुरुजाची तसेच गार्डनमधील भिंत बांधण्यास सांगितले त्यानुसार काम सुरू केले आहे तसेच पाचबीबी येथील जीर्ण झालेले बांधकाम काढून त्याठिकाणी नवीन बांधकाम करून त्यावर पत्रा टाकणे या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. सदर जागा शासकीय असेल तर ठराव घेऊन त्यानुसार काम करण्यात येईल. सध्या दीड ते दोन लाखाचे काम,संपण्याच्या मार्गावर आहे अशी माहिती मुख्याधिकारी श्री रामराजे कापरे यांचे वतीने इंजिनिअर श्री.रविराज राऊत यांनी दिली.
वास्तविक पाहता मा.ना.दत्तात्रय भरणे व प्रदीपदादा गारटकर यांचे माध्यमातून शहरासाठी जवळपास 50 कोटी रुपयांचा निधी दिला आहे शहरातील मशिदी, ग्रामदैवत इंद्रेश्वर देवस्थान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, श्री.संत रोहिदास मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, नामदेव मंदिर, माळावरची देवी इ. देवस्थानांना भरघोस निधी दिला, आहे, आसे,मा.ना.दत्तात्रय भरणे यांचे खंदेसमर्थक
मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस,यांनी सांगितले, ते म्हणतात की मा.ना.दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून आनेक गावातील मंदिर, सभामंडप, समाज मंदीर,उभारण्यात आले आहेत,आसेही बाब्रस आमच्याशी बोलताना म्हणाले,
म्हणाले या वेळेस शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, महिला शहराध्यक्षा उमाताई इंगुले, नगरसेवक वसंतराव माळुजकर, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले, विरोधी पक्षनेता पोपट शिंदे, अहमदराजा सय्यद, इम्रानभाई शेख, पप्पू शेख इत्यादी उपस्थित होते.
टिप्पण्या