चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी इंदापूरात साजरी
इंदापूर:- येथे चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. इंदापूर जि. पुणे येथील संत रोहिदास नगर येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज,यांच्या पुण्यतिथी निमित्त मा.नगराध्यक्ष श्री.विठ्ठलराव आप्पा ननवरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी,
मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे,अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अहेमदरजा सय्यद ,अँड. ज्ञानदेव ननवरे,गणेश शेवाळे,कमलाकर कांबळे,सचिन शेवाळे,प्रविण ननवरे,सुभाष ननवरे,कृष्णा हाब्बू,शाहरूख मोमीन व सर्व समाज बांधव उपस्थित होते.या वेळी बोलताना,विठ्ठलराव ननवरे म्हणाले की,
समाजातील जाती-पाती,गरीब -श्रीमंती सारखे भेदभाव दूर करून समाजाला मानवतेची शिकवण देणारे महान संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे विचार समाजातील प्रत्येक नागरिकांनी आत्मसात करणे काळाची खरी गरज आहे.या महान संतास उत्तर भारतात संत रविदास तर आपल्या महाराष्ट्रात त्यांना संत रोहिदास म्हणून ओळखले जाते. सोळा प्रकारच्या विविध नावांनी ओळखले जाणारे एकमेव संत म्हणून संत रोहिदासांना ओळखले जाते.शिखांच्या गुरूग्रंथसाहेब या पवित्रग्रंथात संत रोहिदासांचे एकूण ४० पदे आहेत.तसेच संत रोहिदास यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला 'द् अनटचेबल' नावाचा ग्रंथ संत रोहिदासांचरणी अर्पण केला होता. देशात एकजूटीसाठी प्रयत्न करणारे संत म्हणूनही त्यांना ओळखले जाते. मानवतावादी संत रोहिदासांचे विचार अनेक समकालीन संतांनी प्रत्येक समाजातील घटकापर्यंत पोहचविले.अशा महान संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे मानवतावादी विचार समाजातील प्रत्येक नागरिकांनी आत्मसात करणे काळाची खरी गरज आसे ही ननवरे म्हणाले,.
टिप्पण्या