सैनिक दलाच्या वतीने, २६ नोव्हेंबर "संविधान दिन" एक अनोख्या पद्धतीने साजरा- अशोकराव पोळ
इंदापूर:- दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ ते ०१ या वेळेत समता सैनिक दल, या राष्ट्रीय सामाजिक मातृसंघटनेच्या वतिने सर्व समता सैनिकांनी व पदाअधिकाऱ्यांनी सालाबाद प्रमाणे २६ नोव्हेंबर "संविधान दिन" एक अनोख्या पद्धतीने साजरा केला.
या संविधान दिनाचे औचित्य साधुन इंदापूर नगरपरिषदेसमोरील छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन करुन इंदापूर शहरातील मध्यभागी असलेला खडकपुरा चौकामधील संविधान स्तंभाला फुलांच्या माळांने सजवुन त्याठिकाणी उ्द्देशीकेच्या वाचनासह जयघोष करण्यात आला.
इंदापूर तालूका तहसील कार्यालय, इंदापूर पोलीस स्टेशन, इंदापूर पंचायत समिती आणि इंदापूर नगरपालिका या शासकीय कार्यालयामध्ये भारतीय संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन करून त्या त्या विभागांच्या प्रमुखांच्या उपस्थित संविधानाची उद्देशीकेचा फोटो कार्यालयामध्ये समोर दर्शनीभागावर लावण्यासाठी १८ × २० आकाराचे फ्रेमसह तैल्यचित्र (फोटो ) समता सैनिक दलाच्या सौजन्याने भेट करण्यात आले.
यावेळी सर्व विभागातील प्रमुखांसमवेत समता सैनिक दलाचे पुणेजिल्हा अध्यक्ष अशोकराव पोळ यांच्या सह इंदापूर तालुका अध्यक्ष मा. सुभेदार तानाजी मोरे, उपाध्यक्ष मा. शशिकांत गायकवाड, पुणेजिल्हा कायदेशीर सल्लागार अँड. जे. एन. पोळ, तालूका कार्यध्यक्ष मा. शामराव जाधव, तालूका संपर्क प्रमुख मा. सुर्यकांतजी चव्हाण सर, जेष्ठ मार्गदर्शक मा. जयसिंग जाधव, सामाजिक कार्यकर्ते मा. नंदकुमार खंडाळे, संकेत चितारे, शक्तिकुमार खरात, दादा औताडे, लव्हु पोळ, वनेश कांबळे, मेजर भजनदास गायकवाड, सुरेश शिरसट सह अन्य संघटनेचे तमाम कार्यकर्ते व समता सैनिक उपस्थित होते.
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन मा. विनय मखरे गुरुजी यांनी केले तर सुत्र संचालन सामाजिक कार्यकर्ते संतोषजी जामदार यांनी करुन आभार मानले.
टिप्पण्या