इंदापूर:-योग साधनेच्या जोरावर व्याधीमुक्त झालेल्या इंदापूर पतंजली योग समितीच्या ज्येष्ठ नागरिकांनी आपली मानसिक, शारीरिक दुर्बलता दूर करून चढाईसाठी अवघड असणारा वासोटा किल्ल्याचे ट्रेकिंग पूर्ण केले.त्याबद्दल राधिका सेवा संस्था व स्वर्गीय मंगेश बाबा पाटील प्रतिष्ठान यांचे वतीने त्यांच्या या कार्यकतृत्वाचा सत्कार इंदापूर नगरपरीषदेचे मा.उपनगराध्यक्ष अरविंद वाघ,माजी नगरसेवक शेखर पाटील,अॅड.विशालजी चव्हाण, हमीदभाई आत्तार, जयकुमार शिंदे यांचे हस्ते करण्यात आला..
नियमितपणे योगासने आणि प्राणायाम जर केला तर व्यक्ती व्याधीमुक्त तर होतोच त्याबरोबर त्याचे वृद्धत्व आणि मनोबल हे तरुणांसारखे होते.
सध्याच्या काळामध्ये गड किल्ले चढावे तर युवकांनी ट्रेकिंग पूर्ण करावे ते युवकांनी. ज्येष्ठांनी आपले घर आणि तब्येत सांभाळावी असे म्हटले जाते परंतु ' *जिनके हौसले बुलंद होते है उनकी जीत निश्चित होती है. कठीनिइया भी हार जाती है मेहनत जिनकी मजबूत होती है*'
*व्याधिमुक्त झालेल्या या जेष्ठांचा सत्कार करण्यात आला..*
*राजेंद्र चव्हाण (वय 67) परॅलिसिस,सुनील देवळालीकर (वय 65) बायपास सर्जरी, चंद्रकांत देवकर( वय 66) अर्थरायटीस ,भिमराव वनवे ( वय 65)अन्जीओप्लास्टी,मल्हारी घाडगे(वय 64)गूडघ्याचा संधिवात, काशिनाथ पारेकर (वय 59)उच्च रक्तदाब देवराव मते(वय 59)अस्थमा.**
वरील जेष्ठ योगसाधकांसोबत युवा भारतचे कार्यकर्ते सोबत होते.
सत्काराच्या कार्यक्रमासाठी बिभिषण खबाले रामेश्वरजी साठे,सचिन पवार ,प्रशांत गिड्डे,डॉक्टर दत्तात्रय कांबळे,ज्ञानदेव बोराटे, किसन पवार आण्णासाहेब चोपडे,ज्ञानदेव डोंगरे, शंकर काशीद,विकास खिलारे सुधीर दोंड व महिला योग समितीच्या मेघाताई भंडारी,रेखाताई भंडारी, सिंधू घाडगे स्वेता कुलते यांचेसह योगसाधक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र परबत यांनी तर आभार प्रदर्शन शरद झोळ यांनी केले.
टिप्पण्या