खा. सुप्रियाताई सुळे यांच्यावर अपशब्द वापरणाऱ्या कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा
श्री.महारूद्र पाटील मा.अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुका यांनी केला जाहीर निषेध
इंदापूर:- खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरत टीका केली. या विरोधात श्री.महारूद्र पाटील मा.अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुका, सुप्रियाताई सुळे यांची कृषिमंत्र्यांनी व्यक्तिगत माफी मागावी व महिलांबाबत अपमानकारक विधान करणाऱ्या मंत्र्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी बोलताना,श्री.महारूद्र पाटील मा.अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुका,
म्हणाले , आपल्या मंत्रीमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत अशोभनीय व असंस्कृत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. खासदार सुप्रियाताई सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागेल! या वेळी अमोलशेठ भिसे, किसनराव जावळे,
शिवसेना नेते, वसंतराव आरडे म्हणाले की अब्दुल सत्तार सारख्या हरामखोर मंत्र्यांना वेळीच यांना घरी बसवणे गरजेचे आहे, या वेळेस महादेव सोमवंशी,दुर्वास शेवाळे,सह इतर मान्यवर उपस्थित होते,
टिप्पण्या