*ABS GYM तर्फे "फॅट टू फीट " वेट लाॅस चॅलेंज, या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न.*
इंदापूर : ABS GYM तर्फे "फॅट टु फीट, वेट लाॅस चॅलेंज" या स्पर्धेचे आयोजन 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2022 दरम्यान जो स्पर्धक जास्तीत जास्त वजन कमी करेल तो विजेता असे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोमवार (दि. १४) रोजी ABS GYM इंदापूर येथे संपन्न झाला.
या स्पर्धेत सुशांत किर्ते यांनी स्पर्धेच्या कालावधी दरम्यान ९ किलो वजन कमी करून प्रथम क्रमांक पटकाविला. त्याबरोबर जुबेरभाई बागवान(५.५ कि), शाहरुख कुरेशी(४.७ कि), मुस्तफा सय्यद (३.५ कि)यांनी द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ABS GYM तर्फे व वसिमभाई शेख यांचे हस्ते नॉईज कंपनीचे डिजिटल वाॅच, अल्फा मल्टिकार सर्व्हिस चे रमीजभाई शेख यांचे तर्फे BCAA, सारा कलेक्शन चे मुस्तफा सय्यद यांचेकडून रक्कम एक हजार रुपये चे गिफ़्ट वॉउचर तर शिवराज हाॅटेल चे समीर सुर्यवंशी यांचेतर्फे रोख रक्कम पाचशे रुपये असे बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात बोलताना ABS GYM चे मालक (संस्थापक) मोहसीनभाई शेख यांनी वर्षातून दोनदा असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी तसेच तब्येत तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोकांना प्रेरणा मिळावी हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
यावेळी बक्षीस वितरण समारंभास वसीमभाई शेख, योगेश कांबळे, रमीजभाई शेख, समीर सुर्यवंशी व एबीएस जिमचे इतर सदस्य उपस्थित होते.
टिप्पण्या