इंदापुर - दिनांक 28 नोव्हेंबर रोजी इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला ,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालया मध्ये प्रथम वर्ष एम एस सी (रसायनशास्त्र)विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली
कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जीवन सरवदे यांनी महाविद्यालयातील उच्च शिक्षण घेण्यासाठी सर्व सुविधा, रिसर्च सेंटर, पी एच डी रजिस्ट्रेशन साठी विदयार्थ्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू, असा विश्वास विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर यांनी दिला. रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ . जयश्री गटकुळ यांनी गुलामांना गुलामीची जाणीव करून देण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही म्हणून शिक्षणाची मुहुर्त मेढ रोवणारे स्त्री शिक्षणाचे प्रवर्तक, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा जोतीबा फुले यांनी बहुजन समाज शिक्षित करण्यासाठीं आयुष्य झिजवले, आजच्या काळात तरुण पिढीने शिक्षण क्षेत्रात सजग, सक्षम होण्यासाठी महामानव क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या विचारांचे वारसदार होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले, रसायनशास्त्र विभागातील विदयार्थ्यांना डॉ. उत्तम माने, डॉ.महादेव शिंदे यांनी मार्गदर्शन केले रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. उत्तम माने , डॉ . राजेंद्र भोसले , डॉ . महादेव शिंदे , डॉ . मोनाली पाटील, प्रा. सचिन खरात , प्रा. विशाल चिंतामणी , प्रा. प्रशांत साठे , प्रा.योगेश झगडे , प्रा. प्रांजली नलवडे आणि प्रा. सफिया शेख, सर्व कर्मचारी आणि प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आदी उपस्थित होते .
दिव्या जाधव , शंकलेश चव्हाण ,नुरमहमद शेख, अजय सुरवसे
या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले, सुत्रसंचालन माधुरी सरडे, आशुतोष मगर यांनी केले शंकेलश चव्हाण यांनी आभार मानले.
ज्ञानदेव पवार, निखिल वायाळ, समाधान वाघमोडे, संजय खडके, माऊली पवार,माधुरी शिंदे, भारती कचरे, आदेश डांगे, रोहन फलफले, नागेश गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले
टिप्पण्या