क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंना
स्मृतिदिनी रत्नाकर तात्यांच्या शाळेत अभिवादन,
*इंदापूर* (दि.२८) -: येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, ,माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
यावेळी तथागत गौतम बुद्ध, क्रांतीसुर्य महात्मा फुले व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर (तात्या) मखरे यांच्या प्रतिमांचे पूजन प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार व माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या प्राचार्या अनिता साळवे यांच्या हस्ते पुष्पहार व पुष्प अर्पण करून करण्यात आले.
यावेळी दिपाली ठोंबरे,रूपाली ठोंबरे, अंजली गव्हाणे, (७ वी) यांनी गीत सादर केले. दत्ता घुंगासे, सुजित निकम, पुंडलिक रोकडे, अनिल मंजुळे (१२ वी)आदी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
यावेळी प्राथमिकचे मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी महात्मा फुलेंच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.
कार्यक्रमास सर्व विद्यार्थी,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या