कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याच्या माध्यमातून सहकार टिकवण्याचा देशातील पहिलाच उपक्रम - हर्षवर्धन पाटील
ओंकार शुगरचा सहयोग •बोत्रे-पाटील यांच्या उपस्थितीत गळीत हंगाम शुभारंभ इंदापूर : प्रतिनिधी दि.3/11/25 कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना ही आपली सर्वांची मातृसंस्था आहे, या संस्थेमुळेच इंदापूर तालुका सर्वांगीण क्षेत्रात अग्रेसर राहिला आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याच्या माध्यमातून व ओंकार शुगरचा सहयोगातून सहकार टिकविण्याचा हा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. या सहयोगाच्या माध्यमातून सहकारातील शेतकरी, कामगार टिकवण्याचे काम होणार असून, शेतकऱ्यांच्या सर्व उसाचे वेळेवर गाळप व उच्चांकी भाव देणेसाठी आंम्ही कटिबद्ध राहू, अशी ग्वाही राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सॊमवारी (दि. 3) दिली. महात्मा फुलेनगर (बिजवडी) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लि., सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टीलरी पॉवर प्रा.लि. चा सन 2025-26 च्या 36 व्या हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन...