जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी, इंदापूर प्रशालेत *स्काऊट गाईड स्थापना दिन* उत्साहात साजरा ..
इंदापूर दिनांक 7 नोव्हेंबर भारत स्काऊट अँड गाईड युनिट अधिकारी, कब, बुलबुल, स्काऊट आणि गाईड मुलांसोबत अतिशय उत्साहात शाळेच्या मैदानावर स्काऊट *स्काऊट गाईड स्थापना दिन* संपन्न झाला. या कार्यक्रमात राष्ट्रगीत, राज्यगीत, स्काऊट झेंडा गीत आणि प्रार्थना घेण्यात आली या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री. श्रीमंतजी ढोले सर, उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा ढोले मॅडम, सचिव आदरणीय हर्षवर्धनजी खाडे सर, मुख्य सल्लागार आदरणीय श्री.प्रदीपजी गुरव सर, विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य श्री. गणेश पवार सर,विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. सम्राट खेडकर सर,
प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य श्री. राजेंद्र सरगर सर होते. संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांनी आपल्या मनोगतातून भारताची आदर्श पिढी घडवण्यासाठी स्काऊट अँड गाईड कसे उपयोगी आहे याबद्दल विचार मांडले, देशभक्ती, सेवाभाव, आदर, स्वयंशिस्त, उत्तम आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्
टिप्पण्या