वाल्हे प्रतिनिधी -सिकंदर नदाफ भारतीय पत्रकार संघ ( ए. आय. जे.) सातारा विभागाचा परिसंवाद तथा पदग्रहण सोहळा फलटण येथील नवलबाई मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला.
यावेळी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पुजनाने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी परिसंवाद सत्रात युवा पत्रकारांसह जेष्ठ पत्रकारांनी आपली मनोगते व्यक्त करताना उपस्थितांची मने जिंकली तर भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रमजी सेन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून पत्रकारांना मार्गदर्शन करताना पत्रकार संघाची भूमिका स्पष्ट केली.या दरम्यान माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर तसेच विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते वसंत सागर तसेच वतन की लकीर या साप्ताहिकांचे प्रकाशन करून जेष्ठ पत्रकार तथा लेखक रवींद्र बेडकीहाळ यांसह विविध भागातील पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी भारतीय पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष एम. एस. शेख लिगल विंगचे प्रदेशाध्यक्ष कैलास पठारे विभागीय अध्यक्ष रमेश मामा गणगे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष संदीपकुमार जाधव महिला विभागाच्या उपप्रमुख सोनाली माने पुणे जिल्हाध्यक्ष तैनूर शेख जिल्हाप्रमुख आरती बाबर जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष लतीफ नदाफ फलटणचे तालुकाध्यक्ष राजकुमार काकडे हल्ला कृती समितीचे प्रमुख आप्पासाहेब तांबे सांगलीचे संघटक प्रमुख आंनदा सुतार यांसह बहुसंख्य पत्रकार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास शिंदे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार भारतीय पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ यांनी मानले.
टिप्पण्या