सुकलवाडी ( ता .पुरंदर ) येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहाचा प्रशिक्षण व मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या अभियानाव्दारे महिलांना बचतगटांमध्ये सहभागी करून अनेक योजनेचा लाभ घेता यावा यासाठी मशाल फेरी काढून जनजागृती करण्यात आली तर प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमात सर्व बचतगटांचा आढावा देखील घेण्यात आला.
या दरम्यान सर्व महिलांना लखपती दीदी, बँक कर्ज, महिला शेतकरी उत्पादक गट, रोजगार प्रशिक्षण या बाबतची सखोल माहिती देण्यात आली तसेच सहभागी पद्धतीने गरीब कुटुंबांची ओळख करून एकल महिलांसाठी नव्याने बचत गटांची स्थापना देखील करण्यात आली.
याप्रसंगी सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार यांसह योगेश पवार उर्मिला पवार वैजंता दाते तंटामुक्ती समितीच्या उपाध्यक्ष संध्या पवार ग्रामसंघाच्या अध्यक्षा रुपाली पवार वनिता पवार प्रियांका पवार शर्मिला पवार तसेच पुरंदर पंचायत समितीचे अधिकारी व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
टिप्पण्या