जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यात राजकीय समीकरणे रंगवली जात असताना नीरा कोळविहीरे गटात ओ.बी.सी. प्रवर्गातून सविता राजेंद्र बरकडे ह्या कॉंग्रेसच्या प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आल्या आहेत. उच्चशिक्षित प्रामाणिकपणा धोरणात्मक दृष्टी अफाट जनसंपर्क आणि विकासासाठी ट्रॅक रेकोर्ड करणाऱ्या महिला उमेदवार म्हणून त्यांच्याकडे जनतेचे लक्ष वेधले आहे.
एकीकडे नीरा कोळविहीरे गटात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भाजप शिवसेना ( एकनाथ शिंदे ) तसेच राष्ट्रवादी ( अजित पवार ) कडून आचार विचारांची कदर राखत गठबंधनावर भर देण्याचा प्रयत्न केला जात आहे.तर महाविकास आघाडीत शिवसेना ( उबाठा ) राष्ट्रवादी (शरद पवार ) तसेच कॉंग्रेससह इतर पक्षाच्या नेत्यांमध्ये समन्वय नसल्याने निश्चितच महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नीरा कोळविहीरे गटात चौरंगी लढतीचे संकेत मिळू लागले असून कॉंग्रेस पक्षाकडून उच्चशिक्षित असलेल्या सविता बरकडे यांना अधिकृत उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
तर सामाजिक क्षेत्रात आपल्या नावाचा आगळावेगळा ठसा उमटविणाऱ्या सविता बरकडे यांना माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांच्या कार्याची दखल या निवडणुकीत मतदारराजा नक्कीच घेणार असल्याची स्तुत्य चर्चा परिसरात रंगली आहे.
टिप्पण्या