इंदापूर तालुक्यातील पारेकरवस्तीः, वनगळी शाळेतील शिक्षक संतोष घोडके व सविता पवार यांची जिल्हा अंतर्गत बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभाचा व शाळेत नव्याने बदली होऊन भलेिल्या शिक्षिका शोभा गनगले व यास्मिन नदाफ यांच्या स्वागताचा कार्यक्रम शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ पारेकरवस्ती यांनी आयोजित केला होता. व्यावेळी सत्कार समारंभात बोलताना अमोलजी थिसे म्हणाले," जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गुणवंत व कार्यक्षम असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी ते प्रामाणिक प्रयत्न करीत माहेत. या शाळेतील शिक्षक संतोष घोडके, सविता पवार यांनी उल्लेखनीय काम केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना मंथन, प्रज्ञाशोध, सामान्यज्ञान व इतर विविध स्वधविरीसांना बसवून राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळविले आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी शालेय, सहालिय उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केले. गावातील पालकांचा लोकसहभाग घेऊन शाळा डिजीटल केली असून शाळेला आकर्षक रंगरंगोटी केली आहे. विद्यार्थ्यांसाठी मावश्यक भौतिक सुविधा निर्माण केल्या, विदयार्थ्यांच्या जीवनाला दिशा देण्याचे काम केले आहे. या शाळेतील विद्यार्थी देशाचे सक्षम नागरिक बनून आयुष्यात यशस्वी होतील तेच शिक्षकांचे यश असेल." आसे गौरवोद्गार अनिल पारेकर यांनी काढले. यावेळी व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रूपाली पारेकर, मा. सदस्या नंदाताई पारेकर, मा.उपसरपंच पोडुरंग पारेकर, यशवंत पारेकर माणिकराव पाटील', सुदाम पारेकर, सुरेश भिसे, हनुमंत तुपे, दलात्रय कामले कमलाकर पारेकर, शिवाजी बोडके, मोहन पवार, दत्तात्रय गनगले, नासीर शेख व मोठ्या प्रमाणावर महिला पालकवर्ग, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक / सूत्रसंचालन अॅड. अनिल पारेकर तर आभारप्रदर्शन समाधान पारेकर यांनी केले.
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या