सिटी इंडिया मराठी न्यूज व सिटी फाउंडेशन तर्फे दिला जाणारा जिल्हास्तरीय पुरस्कार अनिताताई खरात यांना प्रधान
पुणे जिल्ह्यातून सिटी फाउंडेशन व सिटी इंडिया मराठी न्यूज यांच्यातर्फे दरवर्षी ज्येष्ठ गीतकार व गायक आप्पा पांचाळ यांच्या वाढदिवसानिमित्त दिला जाणारा जिल्हास्तरीय पुरस्कार यावर्षी इंदापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या सौ.अनिताताई नानासाहेब खरात यांना प्रदान करण्यात आला, सामाजिक शैक्षणिक गोरगरिबांना शेतकऱ्यांना महिलांना व युवकांना प्रत्येक वेळी पुढे होऊन मदत करणारी व्यक्ती म्हणजे अनिताताई खरात या असून आम्ही सर्वे करत असताना त्यांचं नाव प्रकर्षाने पुढे आले त्या दृष्टीने आम्ही त्यांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार प्रदान करत आहोत असे सिटी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले .
पुणे येथे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन अनिताताई खरात यांचा गौरव करण्यात आला, यावेळी तुकाराम सुतार ,विष्णू कुमार देशपांडे ,आप्पा पांचाळ, ॲड नितीन कदम तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवर , कलाकार उपस्थित होते.
पुरस्कारला उत्तर देताना अनिताताई म्हणाल्या की सिटी फाउंडेशन व सिटी इंडिया न्यूज यांनी जिल्ह्यातून जो माझ्यावर विश्वास ठेवून जो हा पुरस्कार मला दिला त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानते व त्यांनी जो हा पुरस्कार मला दिला त्या पुरस्कारला पात्र राहून इथून पुढे जास्तीत जास्त सामाजिक काम करण्याचा प्रयत्न करून मी त्यांच्या विश्वासाला उतरेल तसेच मी तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक कामाला प्राधान्य देते आमच्याकडे कोणताही पक्ष कोणताही जात धर्म न बघता आम्ही काम करतो येथून पुढेही मी राजकारणापेक्षा सामाजिक कामालाच महत्त्व देऊन गोरगरीब शेतकरी कष्टकरी माझ्या महिला भगिनी विद्यार्थी यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी माझ्याकडून सर्व तो प्रयत्न केला जाईल.
यावेळी अनेक मान्यवर तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या