इंदापूर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व शिवसेना उपनेते, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या सूचनेनुसार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय काळे, जिल्हा समन्वयक भीमराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी इंदापूर नगरपरिषद निवडणुकीसाठीची उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली. शिवसेना ठाकरे पक्ष नगराध्यक्षपदासह सर्वच जागा लढवणार असल्याचे तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी सांगितले.
नगराध्यक्षपदासाठी श्री महादेव वसंत सोमवंशी,
प्रभाग क्र २ - श्री प्रविण ( दादा ) प्रकाश देवकर
प्रभाग क्र ३ - श्री महादेव वसंत सोमवंशी
प्रभाग क्र ५ - श्री बालाजी गुणवंतराव पाटील
प्रभाग क्र ६ - सौ तेजश्री प्रदीप पवार
श्री संतोष मोहन क्षीरसागर
प्रभाग क्र ८ - श्री बंडु पांडुरंग शेवाळे
प्रभाग क्र १०- सौ पुजा श्रीधर खंडाळे
श्री ज्ञानोबा नारायण खंडागळे
या उमेदवारांची यादी दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी इंदापूर येथे झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर करण्यात आली. उर्वरित प्रभागातील उमेदवारांची दुसरी यादी येत्या दोन दिवसांत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख संजय काळे व तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी सांगितले.
सदरील बैठकीस जिल्हा समन्वयक भीमराव भोसले, इंदापूर शहरप्रमुख मे महादेव सोमवंशी, तालुका संघटक सुदर्शन रणवरे, तालुका समन्वयक अरुण पवार, युवासेना जिल्हा समन्वयक ॲड राहुल बंडगर, युवासेना तालुकाप्रमुख सचिन इंगळे, महिला तालुका संघटिका राणुताई इंगवले यांच्यासह इंदापूर शहरातील संतोष क्षीरसागर, अविनाश खंडाळे, प्रदीप पवार, दादा देवकर, बंडु शेवाळे, देवा मगर, माऊली चौगुले, योगेश जायभाय इत्यादी पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील सर्व उपतालुकाप्रमुख, सर्व विभागप्रमुख, सर्व उपविभागप्रमुख व शाखाप्रमुख उपस्थित होते.
टिप्पण्या