इंदापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया अधिकाधिक समावेशक सुलभ आणि सहभागी करण्यासाठी स्वीप ( SVEEP ) अंतर्गत इंदापूर नगर परिषदेतर्फे व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. सदर अभियानांतर्गत डॉक्टर शुभम गाडेकर व डॉक्टर भाग्य श्री. चव्हाण कुटुंबाच्या लग्न समारंभाप्रसंगी नवदापत्त्याने सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून इंदापूर शहरातील सर्व मतदारांना मतदान करण्याचे केले आव्हान . नागरिकांनी नैतिकरित्या, निर्भीडपणे आपल्या मतदानाच्या अमूल्य अधिकाराचा वापर करून मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्री सुधाकर मागाडे , सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री रमेश ढगे यांनी केले त्यावेळी उपस्थित कर्मचारी मनोज भापकर अल्ताफ पठाण प्रसाद देशमुख, सुरेश सोनवणे, या सर्वांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला.
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या