वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ
वाल्हे (ता. पुरंदर ) ग्रामपंचायतीच्या वतीने भारतीय राज्यघटनेचा (संविधान) वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला .
यावेळी वाल्हे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात नवनिर्वाचित उपसरपंच सागर भुजबळ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान पुस्तकाचे पूजन तसेच संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.तसेच २६/११ मधील शहिदांना श्रद्धांजली देखील वाहण्यात आली.
याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी अनिल हिरासकर माजी उपसरपंच अमित पवार सम्राज्ञी लंबाते यांसह तंटामुक्तीचे अध्यक्ष जयवंत भुजबळ प्रहार संघटनेचे वाल्हे शाखाध्यक्ष निलेश कुदळे, ग्रामपंचायत सदस्य कविता पवार वैशाली पवार शीतल मदने प्रमिला पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या