इंदापूर पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी सचिन खुडे यांनी सरडेवाडी जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. तसेच हाता मध्ये खडु घेत बनले.
शिक्षक अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेत लसावी, मसावी विद्यार्थींना शिकवले. यांची शिक्षणाची पद्धत बघुन विद्यार्थी, शिक्षका बरोबर ग्रामस्थही भाराऊन गेले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत ग्रामपंचायतने सिनेटरी पॅड मशिन व सीसीटीव्ही कॅमेरे यांचे उद्धाटन बी. डी. ओ सचिन खुडे यांच्या हस्ते झाले. या वेळी ग्रामसेवक वैभव जाधवर, सरपंच सौ सुप्रियाताई माने -कोळेकर माजी सरपंच सिताराम ( तात्या) जानकर, मुख्याध्यापक शफीक मन्सूर शेख, शिक्षका ज्योती गोसावी मॅडम, शिक्षक महादेव गव्हाणे, बालचंद भोसले, सुरज कोकरे तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या