इंदापूर रांजणी भिमानगर येथील कु. तब्बु जावेद शेख हिची Mpsc मधुन साहायक कक्ष अधिकारी Class 2 मंत्रालय निवड झाली. त्याबद्दल साप्ताहिक शिवसृष्टी परिवार, विठ्ठल महाडिक मित्र परिवार, आसिफ भाई शेख व परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत भिभानगर येथे पुर्ण करुन महाविद्यालयीन शिक्षण आय कॉलेज इंदापूर येथे पुर्ण केले.
कुठलेही तास किंवा क्लास न लावता जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन केले.
सत्कार समारंभाला दत्ता मामा भरणे विकास सेवा संस्थेचे चेअरमन श्री विठ्ठल महाडिक साहेब, साप्ताहिक शिवसृष्टीचे संपादन धनंजयराव कळमकर पाटील, नसरुद्दीन शेख, सरडेवाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य हनुमंत (नाना) जमदाडे, विद्यमान सदस्य गोकुळ (तात्या) कोकरे, उद्योजक आझाद भाई शेख, पत्रकार आसिफ भाई शेख साहिल शेख व मान्यवर मंडळी उपस्थित होती.
टिप्पण्या