इंदापूर(ता.१४) अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील स्कूल अँड कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या पुढाकाराने भिमाई आश्रमशाळेत बालदिन कार्यक्रमाचे आयोजन करुन बालदिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेसह सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, इंदापूरचे माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या प्रतिमांना विद्यार्थ्यांसह अकलूजच्या प्रा. हिरा आगळे व भिमाई आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांसाठी विविध खेळ व मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आपली कला सादर केली.
अकलूज येथील नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनींनी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याने बालदिनाला खास रंगत आली.विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रशालेच्या वतीने उपस्थितांचा यथोचित सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प दिल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला.
यावेळी साहेबराव पवार यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कु.प्रियंका कोरे हिने भाषणातून बालदिनाचे महत्त्व विशद केले.
यावेळी कार्यक्रमास प्राचार्या अनिता साळवे, राजेंद्र सोनवणे,रवींद्र नहिरे, मनिषा मखरे,अनिल ओहोळ, लता सातपुते, निता जगताप,गणेश शिंदे तसेच अकलूजच्या प्रा. हिरा आगळे, प्रा.सायली सुतार,प्रा. साहिल देशमुख,प्रा.गौतमी भोसले,प्रा.प्रतिभा शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता वाघमारे यांनी केले, आभार नानासाहेब सानप यांनी मानले.
टिप्पण्या