इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक
चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.
क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार यांनी केले.
क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देताना सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण झाली पाहिजे, जिद्द निर्माण झाली पाहिजे, जिंकणे महत्त्वाचे नसून खिलाडूवृत्ती वाढली पाहिजे म्हणुनच या क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वानीच दुखापत न होता विविध खेळाचा आनंद घ्यावा असे सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष माननीय श्रीमंत ढोले,
उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले,
सचिव हर्षवर्धन खाडे,संस्थेचे विश्वस्त ऋषिकेश ढोले,
मुख्य सल्लागार प्रदीप गुरव,
विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार , प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य राजेंद्र सरगर, सर्व विभागाचे सुपरवायझर, शिक्षक,क्रिडा शिक्षक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत गुरव यांनी केले.
टिप्पण्या