कै. शंकरराव पाटील तथा भाऊ यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त नीरा-भीमा कारखान्यातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी इंदापूर:- शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर यांच्या संयोगाने कै शंकरराव पाटील तथा भाऊ यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त नीरा-भीमा कारखान्यातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून औषधे दिली . दिनांक.28/2/2022 रोजी दुपारी तीन वाजता आरोग्य तपासणीला सुरुवात झाली. त्यावेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्यांचे कार्यकारी संचालक श्री सुधीर गेंगे पाटील साहेब, संचालक श्री विलास बापू वाघमोडे साहेब संचालक श्री बाबाराव देवकर साहेब,श्री.घोगरे आजिनाथ साहेब श्री कवडे साहेब,यांच्या शुभहस्ते कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीला सुरूवात झाली.51 कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आज झाली. सर्वांच्या सहकार्याने निरा भिमा चे अधिकारी पदाधिकारी कर्मचारी कारखान्यातील विविध विभागांमधील कर्मचारी वर्ग या तपासणी वेळी उपस्थित होता.
SHIVSRUSTHI NEWS