पतंजली योग समिती व युवा भारत इंदापूरच्या वतीने वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकावरती जयंती उत्सव साजरा नगराध्यक्षा अंकिता शहा, मुकुंदशेठ शहा , सायराभाभी आतार , हमीदभाई आतार व इतर
इंदापूर:- पतंजली योग समिती व युवा भारत इंदापूरच्या वतीने वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या स्मारकावरती जयंती उत्सव साजरा करण्यात आला.पतंजली योग समिती आणि युवा भारतच्या नगरपालिकेजवळील स्थायी वर्गातील योगशिक्षक व साधकांनी ती जागा श्रमदानातून साफसफाई करून स्वच्छ केली आणि त्या ठिकाणी शिवजयंती साजरी केली. इंदापूर नगरपरिषदेच्या धडाकेबाज नगराध्यक्षा अंकिताताई शहा इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शेठ शहा या शिवजयंती कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
यावेळी महिला पतंजली योग समितीच्या सायरा आतार, शिवभक्त परिवाराचे सचिन गोळे,मनोज मोरे विकास भोसले,सामाजिक कार्यकर्ते हमीद आतार,योग समितीचे मल्हारी घाडगे, चंद्रकांत देवकर,किसन पवार,तात्यासाहेबे वाघमारे, राजेंद्र चव्हाण,डा. विक्रम पोद्दार,सचिन पवार,मंगेश घाडगे,शरद झोळ,अशोक चिंचकर,अल्ताफ पठाण, चंद्रकांत शिंदे,सुनील अहिरे, रवींद्र परबत, प्रशांत गिड्डे, दत्तात्रय ठोंबरे यांचेसह अनेक शिवभक्त उपस्थित होते.
----------
टिप्पण्या