इंदापूर:- बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे, शिवछत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे अवचित्य साधुन शासकीय विश्रामगृह इंदापूर या ठिकाणी समता सैनिक दलाचे पुणेजिल्हा अध्यक्ष अशोकराव पोळ यांच्या अध्यक्षतेखाली इंदापुर तालूक्याच्या नुतन कार्यकारणीची बैठक संपन्न झाली.
यामध्ये इंदापूर तालुक्यामधील विविध गांवातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या नूतन कार्यकारणीच्या इंदापूर तालुकाध्यक्षपदी मा.सैनिक तानाजी मोरे इंदापूर तालुका उपाध्यक्षपदी शशिकांत गायकवाड, सचिव संकेत चितारे, कायदेशीर सल्लागारपदी अॅड.जयप्रकाश नारायण पोळ, संपर्कप्रमुख सूर्यकांत चव्हाण, कार्याध्यक्ष शामराव जाधव, तर ज्येष्ठ मार्गदर्शक जयसिंग जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.
समता सैनिक दल या संघटनेची रचना गांव तिथे शाखा आणि घर तिथे सैनिक निर्माण व्हावे हिचं बाबासाहेबांची संकल्पना होती बाबासाहेबांच्या जीवन कार्याचा त्याग नजरेसमोर ठेऊन प्रत्येक पदाधिका- यांनी सामाजिक कार्य करावे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संकेत चितारे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी पार पाढण्यासाठी भाऊसाहेब झेंडे, दत्तात्रय सावंत, गणेश गार्डे, रमेश क्षिरसागर, संतोष जाधव, राजेंद्र जमदाडे, यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या