छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२वी जयंती जिजाऊ इंस्टिट्यूट कालठण नं १ येथे मोठ्या उत्साहात साजरी
इंदापूर :-दि १९ फेब्रुवारी २०२२ रोजी स्वराज्य संस्थापक, विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९२ वा जन्मोत्सव सोहळा मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड इंदापूर, संभाजी ब्रिगेड इंदापूर च्या वतीने जिजाऊ इंस्टिट्यूट कालठण नं १ या ठिकाणी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. शिवजन्मोत्सव सोहळ्याची मराठा सेवा संघाच्या परंपरेनुसार सामुहिकजिजाऊ वंदनेने झाली. त्यानंतर प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने सामुहिक शिवजन्माचा पाळणा सादर करण्यात आला. शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आलेल्या प्रत्येक मान्यवरांचे स्वागत व सत्कार हा मराठा सेवा संघाचे संस्थापक युगपुरुष शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर लिखित शिवचरित्र भेट देऊन करण्यात आला. शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त जिजाऊ वेशभूषा, शिवराय वेशभूषा, पारंपारिक वेषभूषा या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी आपले सादरीकरण केले. या आयोजित स्पर्धांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शिव जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त इतिहासकार, व्याख्याते, सचित्र शिवचरित्र कार शिवश्री श्रीमंत कोकाटे यांना त्यांच्या सामाजिक चळवळीतील योगदानाबद्दल शिवभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आयोजित *शिवराय मनांमनात शिवजयंती घराघरात* या स्पर्धेत ही असंख्य शिवप्रेमींनी सहभाग नोंदवला. शिव जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक शिवश्री आप्पासाहेब जगदाळे, पुणे जिल्हा परिषद सदस्य व माजी सभापती आरोग्य व बांधकाम विभाग शिवश्री प्रविण भैय्या माने, निरा- भिमा कारखान्याचे संचालक शिवश्री राजवर्धन दादा पाटील, इंदापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट शिवश्री मनोहर चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली यामध्ये राजवर्धन दादा पाटील म्हणाले की युवक व महिला यांचा शिवजयंती मध्ये वाढता सहभाग नोंद करण्यायोग्य आहे. प्रविण भैय्या माने यांनी मराठा सेवा संघाच्या शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात उपक्रमाचे कौतुक केले व मराठा सेवा संघाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. आप्पासाहेब म्हणाले की शिवचरित्रातूनच प्रेरणा घेऊन आपल्या संस्थेला जिजामाता हे नाव दिले.
डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी आपल्या व्याख्यानातून शिवरायांच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडून सांगितले. शिवरायांचे कृषी धोरण, महिलांविषयी दृष्टीकोन, शिवरायांची युध्दनिती,चातूर्य,तसेच त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, शिवरायांचे गुरू यांचा समावेश होता पुढे ते म्हणाले की शिवरायांची या जगात तुलना फक्त एकाच व्यक्ती बरोबर होऊ शकते आणि ते म्हणजे शिवाजी महाराज म्हणजेच शिवराय हे अतुलनीय होते.
शिव जन्मोत्सव सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी मराठा सेवा संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष शिवश्री राहूल घोगरे, पुणे जिल्हा ( पूर्व) जिजाऊ ब्रिगेड अध्यक्षा डॉ. जयश्री ताई गटकूळ, प्रा. शिवश्री गटकूळ सर,मराठा सेवा संघ इंदापूर तालुका कार्याध्यक्ष शिवश्री महेश कोरटकर, मराठा सेवा संघ कोषाध्यक्ष शिवश्री प्रमोद जगताप, मराठा सेवा संघ इंदापूर शहराध्यक्ष शिवश्री राहूल गुंडेकर, मराठा सेवा संघ इंदापूर शहर उपाध्यक्ष शिवश्री प्रमोद देशमुख, मराठा सेवा संघ इंदापूर तालुका प्रसिद्धी प्रमुख शिवश्री सागर जाधव, मराठा सेवा संघ इंदापूर शहर प्रसिद्धी प्रमुख पै. शिवश्री राजन पवार, मराठा सेवा संघ इंदापूर तालुका संघटक शिवश्री विकीराज घाडगे, मराठा सेवा संघ इंदापूर तालुका उपाध्यक्ष शिवश्री प्रविण ननवरे, जिजाऊ ब्रिगेड तालुकाध्यक्षा शिवमती कल्पनाताई भोर, जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा कार्याध्यक्षा शिवमती राधिकाताई शेळके, जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा उपाध्यक्षा शिवमती जयश्री ताई खबाले, विश्वबाला गटकूळ, जिजाऊ ब्रिगेड शहराध्यक्षा शिवमती पूजा शिंदे संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष शिवश्री मकरंद जगताप, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा संघटक शिवश्री सचिन अनपट,मराठा सेवा संघ इंदापूर संपर्क प्रमुख शिवश्री गणेश रणदिवे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उंबरे सर व शिवश्री गणेश रणदिवे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवश्री राहूल घोगरे व शिवमती जयश्री गटकूळ यांनी केले तर आभार प्रदर्शन मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष शिवश्री महेश कोरटकर यांनी केले.
टिप्पण्या