खासदार,छ.संभाजीराजेंच्या उपोषणास तालुक्यातील सकल मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा
इंदापूर : खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आझाद मैदानात गेल्या तीन दिवसापासून उपोषणाला सुरुवात केली आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा बांधवांनी पाठिंबा दर्शवला असून इंदापूर तालुक्यातील बहुजन समाजातील सर्व जाती धर्माच्या बांधवांनी या उपोषणास पाठिंबा दर्शवला . इंदापूर तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास सकल मराठा बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदवून महाराष्ट्र राज्य सरकारचा जाहीर निषेध नोंदवला, यावेळी श्री . जगदाळे म्हणाले की " महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्य आत्महत्या करणारे शेतकरी मराठा वर्गातील असल्याने आज मराठा समाजाची आर्थिक सामाजिक व शैक्षणिक प्रगती यांचा दर्जा खालावला असून सरकारने याकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष द्यावे व खासदार छ . संभाजी महाराज यांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा अत्यंत तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल . "या वेळी असंख्य समाज बांधव उपस्थित होते,
.......चौकट.......
टिप्पण्या