इंदापूर:-मा.संजय ( भैय्या ) सोनवणे यांचा,अभिष्टचिंतन सोहळा व पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष पदी निवड झालेबद्दल भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून प्रमुख उपस्थिती मा . ना . श्री . दत्तात्रय ( मामा ) भरणे राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा,
मा.आ.जोगेंद्र कवाडे सर राष्ट्रीय अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी मा .श्री . जयदिपभाई कवाडे राष्ट्रीय कार्याध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी मा . श्री . गणेशभाई उन्हवणे प्रदेशाध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी ,विशेष उपस्थिती पीपल्स रिपब्लिकन पार्टी राज्य कार्यकारणी तसेच सर्व जिल्हा अध्यक्ष सर्व युवक जिल्हा अध्यक्ष व महिला आघाडी राज्य कार्यकारणी व विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर संबोधी गायन पार्टी बाभुळगांव , ता . इंदापूर गायक ,विशाल गायकवाड व संच सोमवार दि . १४/०२/२०२२ रोजी सायं . ५ वा . संपन्न होणार आहे .या वेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार वितरण, सोमवार दि . १४/०२/२०२२ रोजी सायं . ६ वा . संपन्न होणार आसल्याची माहीती संजय भैय्या सोनवणे युवा प्रदेशाध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी,यांनी दिली हा भव्य कार्यक्रम इंदापूर नगरपरिषद समोर , इंदापूर येथील प्रांगणात होणार आहे,
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या