इंदापूर:-केंद्र सरकारने ईडीच्या माध्यमातून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर सुडबुद्धीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी सायंकाळी चार वाजता भव्य मोर्चा काढण्यात आला, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याबाबत गारटकर म्हणाले की केंद्र सरकार व केंद्रीय तपास यंत्रणेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणारे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर केंद्र सरकारच्या ईडीने सूडबुद्धीने कारवाई केली . याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा ग्रामीण च्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी प्रदीपदादा गारटकर पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष,पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष दिगांबर दुर्गाडे, युवती अध्यक्ष पुजा बुट्टेपाटील,वसंतराव आरडे, सरचिटणीस पुणे जिल्हा, पुणे जिल्हा युवाध्यक्ष सचिन घोटकुले,सोहेल खान इतर कार्यकर्ते उपस्थित होते,
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या