इंदापूर:-तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी वरदान ठरलेला उपजिल्हारूग्णालय इंदापूर या ठिकाणी गेली अनेक वर्षे अविरत प्रमाणीक पणे सेवा करणारे, डॉ.संतोष खामकर, वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे वैद्यकीय अधिक्षक या पदावर नियुक्ति,झाल्याबद्दल मौर्य क्रांती संघ व समता सैनिक दलाच्या वतीने डाॅ.खामकर यांचा सन्मानकरण्यात आला.
या वेळी अध्यक्ष व विचार मंंथन ग्रुुपचे अॅडमीन प्रकाश पप्पू पवार, समता सैनिक दलाचे पुणे जिल्हाध्यक्ष अशोकराव पोळ,भैय्यासाहेब शिंदे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लोकजनशक्ती पार्टी,भाऊराव झेंडे अध्यक्ष अॅण्टी करप्शन शोषल कमेटी महाराष्ट्र राज्य,व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते, या वेळी बोलताना डॉ. खामकर म्हणाले की,इंदापूर चे हाॅस्पिटल गोरगरीबांसाठी अत्याधुनिक आसून आम्ही रेफर ही पध्दत बंदच करून गोरगरीब रूग्णांना दिलासा मिळेल,आसे सत्काराला उत्तर देताना डाॅ.खामकर म्हणाले
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या