इंदापूर:-तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गतवर्षी 19 फेब्रुवारी शिवजयंती चा मुहूर्त साधून इंदापूर शहरातील बायोडायव्हर्सिटी पार्क येथे जांभळाची झाडं लावण्यात आलेली होती. त्या सर्व जांभळीच्या झाडाचे संगोपन इंदापूर नगरपालिकेचे कर्मचारी यांनी करत एकही झाड न जळून देता त्याची देखभाल केली. आज इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे नरपालिका कर्मचार्यांचे सत्कार करण्यात आला तसेच झाडाचा ही वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला यावेळी इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिताताई शहा उपस्थित होत्या. यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत म्हणाले की लवकरच ह्या जांभळीच्या झाडाचे जांभळाचे फळ इंदापूर शहरातील नागरिकांना खाण्यास मिळो. यावेळी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंंडळाचे सचिव मुकुंदशेठ शहा, इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत, कार्ययाध्यक्ष काकासाहेब देवकर, जिल्हा सरचिटणीस जाकिर काजी, शहर अध्यक्ष चमन बागवान, उपाध्यक्ष तुषार चिंचकर, किसान काँग्रेस सेलचे अध्यक्ष डॉक्टर संतोष होगले, निवास शेळके, महादेव लोंढे, भगवान पासगे आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या