इंदापूर नगरपरिषदेचा रु . १०७ कोटी रकमेचा अर्थसंकल्प मंजूर इंदापूर नगरपरिषदेचे सन 2022-23 या वित्तीय वर्षांचे अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभा दि . 14/02/2022 रोजी ऑनलाईन पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये
इंदापूरः- नगरपरिषदेचा रु . १०७ कोटी रकमेचा अर्थसंकल्प मंजूर इंदापूर नगरपरिषदेचे सन 2022-23 या वित्तीय वर्षांचे अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभा दि . 14/02/2022 रोजी ऑनलाईन पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली . सभेच्या अध्यक्षस्थानी मा . सौ . अंकिता मुकुंद शहा नगराध्यक्ष इंदापूर नगरपरिषद हे होते . सन 2022-23 चा कोणतीही कर वाढ नसलेला रक्कम रुपये 4.43.554 / - शिल्लकेचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला . यामध्ये मागिल वर्षाची शिल्लक रु . 1,23,88,187 / - असून सन 2022-23 मध्ये अंदाजे महसूली व भांडवली जमा रु . 106.46.66,925 / - अपेक्षित धरणेत आलेली आहे . तसेच महसूली खर्च व भांडवली खर्च रुपये 107,66.11.558 / - अपेक्षित धरण्यात आलेला आहे . त्यानुसार सभेमध्ये खालीलप्रमाणे अर्थसंकल्पाबाबत चर्चा करणेत आली . सदर अंदाजपत्रकात इंदापूर शहराच्या विविध विकास कामाकरिता पुढील योजना प्रस्तावित आहे . १ ) इंदापूर नगरपरिषद जुन्या ठिकाणाहून नवीन ठिकाणी स्थलांतरित होणार असल्याने इंदापुर नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीच्या जाग्यावर मल्टीपर्पज पार्क ( यामध्ये Sunday Market , Entertainments . Shopping Complex and ZP School ) विकसित करणे प्रस्तावित आहे या कामासाठी 100 कोटी खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यातील 15 कोटी खर्च करणे प्रस्तावित आहे . २ ) इंदापूर शहरामध्ये क्रिकेट स्टेडीयम व स्विमिंग पूल करणे या कामासाठी 15 कोटी खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यातील 5 कोटी खर्च करणे प्रस्तावित केला आहे . ३ इंदापूरशहर मध्ये मंडई बाजार साठी बाजार ओटे बांधकाम करणे प्रस्तावित आहे . ४ संपूर्ण इंदापूर शहरामध्ये महाराष्ट्र नगरोत्थान योजने अंतर्गत भुयारी गटर करणेसाठी 05 कोटी चे काम असून प्राथमिक अवस्थेतील खर्च प्रस्तापित आहे ५ ) नगरपरिषद कर्मचाऱ्यांची थकीत पगार देणी तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शॉपिंग सेंटर येथील लिलाव उत्पन्न राखीव ठेवण्याचे ठरविण्यात आले . तसेच पुढील विविध योजनामधील खर्च प्रस्तावित आहे 15 वा वित्त आयोग .... 1.60 कोटी अल्पसंख्यांक अनुदान 10 लाख महाराष्ट्र नगरोत्थान योजना ... 10 कोटी रस्ता व विशेष रस्ता अनुदान ... 3.70 कोटी सुजल निर्मल अभियान ... 50 लाख नागरी दलित वस्ती योजना ... 2.5 कोटी वैशिष्टपूर्ण योजना ... 25 कोटीनागरी दलितेतर योजना ... 2 कोटी स्थानिक विकास निधी व खासदार फंड ... 50 लाख अग्निशमन योजना ... 10 लाख स्वच्छ भारत अभियान ... 10 कोटी प्रधानमंत्री आवास योजना ... 2 कोटी सदर सभेमध्ये नगराध्यक्ष मा . सौ . अंकिता मुकुंद शहा तसेच मा . उपनगराध्यक्ष , सर्व विभागाचे सभापती सर्व मान्यवर नगरसेवक व नगरसेविका यांनी उपस्थित राहून सदर सभेच्या चर्चेत सहभाग घेतला . सभेस सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते . सभेचे कामकाज संपल्यानंतर मा . नगराध्यक्ष मा . सौ . अंकिता मुकुंद शहा यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करुन सर्वांचे आभार मानले .
टिप्पण्या