पडस्थळ येथे अन्नदान करून धुमधडाक्यात शिवजयंती साजरी....
इंदापूर तालुक्यातील पडस्थळ येथे धुमधडाक्यात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली ,
19 फेब्रुवारी हा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती महोत्सव दिन म्हणून सर्वत्र आनंदाने साजरा केला जातो. छत्रपती शिवरायांनी परकीय आक्रमणापासून, वाईट शक्ती पासून स्वराज्याचे रक्षण केले. रयतेचे राज्य स्थापन करून, स्वतःची राज्यव्यवस्था प्रस्थापित केली.असंघटित लोकांना संघटित करून स्वतःची फौज तयार केली. त्या माध्यमातून गड-किल्ल्यांचे, मंदिरांचे व सार्वजनिक व्यवस्थेचे रक्षण केले. जाती व्यवस्था नष्ट करून सर्वधर्म समभाव प्रस्थापित केला. अशा रयतेच्या राजाची 392 वी जयंती पडस्थळ येथे अन्नदान करून साजरी करण्यात आली. शिव प्रतिमेचे पूजन करून पारंपारिक वाद्यांच्या निनादात संपूर्ण गावातून आबालवृद्ध या मध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होते, पारंपारिक वाद्यसंगीतात मिरवणूक काढण्यात आली.
शिवजयंती महोत्सव पार पडण्यासाठी सुरज पवार,कार्तीक बोंगाणे,प्रतीक बोंगाणे,प्रसाद बोंगाणे,प्रणव बोंगाणे,विराज बोंगाणे,रिषभ बोंगाणे,अमित बोंगाणे,भैय्या बोंगाणे,ओम आवटे,ओंकार आवटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी पांडुरंग मारकड, सुग्रीव बोंगाणे,परशुराम रेडके, कैलास रेडके, भारत बोंगाणे, बळीराम बोंगाणे, परमेश्वर कोळेकर, रामचंद्र कोळेकर लक्ष्मण बोंगाणे,महेंद्र रेडके, सुभाष बोंगाणे, लक्ष्मण मारकड, नाथाजी चौगुले, नवनाथ भिसे तसेच
सर्व जाती-धर्माचे लोक उपस्थित होते.हा कार्यक्रम शोशल डिस्टंन्स ठेवून सॅनिटाझर व मास्क चा वापर करून पार पडला.
टिप्पण्या