इंदापूर:- सालाबाद प्रमाणे याही वर्षी छ्त्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळ्याची मिरवणूक काढण्यात येणार आहे. इतर सर्व कार्यक्रम नियोजित वेळेत नियोजनाप्रमाणे होतील असे यावेळी मखरे यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ट्रस्टच्या वतीने शासकीय विश्रामगृहात ही बैठक पारपडली या वेळी पत्रकार परिषदेत राहुल मखरे म्हणाले की, बहुजन प्रतिपालक, कुळवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती संदर्भात माध्यमांना मखरे यांनी शिवजयंती सोहळ्यात बाबत माहिती दिली.शिवजयंती निमित्त दि.१९ व २० फेब्रुवारी २०२२ ला होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.
दि . १ ९ / ०२ / २०२२ - दु ०४ वाढ दु ० १२ वा . ते ४ वा . पर्यंत - आश्रमशाळेत स्नेहभोजन – भिमाई आश्रमशाळेपासुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणुकीस सुरुवात : मिरवणुकीमध्ये न्यू अमर बॅन्ड बारामती , अनमोल ,बॅन्ड बीड , हालगी पथक अकलुज व घोड़े असतील . जेतवन ' वृद्ध विहार येथे वंदना घेऊन छ .
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन मा . ना . दत्तात्रय मामा भरणे , राज्यमंत्री यांचे हस्ते . प्रमुख उपस्थिती, मा.यशवंत तात्या माने आमदार मोहोळ - मा.योगेशदादा पवार खजिनदार विद्या प्रतिष्ठाण , बारामती यांच्या. अध्यक्षता खाली हा कार्यक्रम होणार आहे,मिरवणूक मार्ग हाय वे -'जेतवन ' विहार- -नेहरू चौक - खडखपुरा नगरपालीका मैदान . नगरपालीका मैदानावर सायं . ७ वा . शिवशाहीर राजेंद्र कांबळे , खुडसकर यांच्या शाहीरीचा कार्यक्रम होणार उपस्थित मान्यवरांची प्रस्तावना व मनोगते . दि .२०/२/२०२२ सायं . ७ वा . नगरपालीका मैदानावर इतिहास तज्ञ डॉ . श्रीमंत कोकाटे यांचे .. प्रबोधनपर व्याख्यानः लोकगीतकार विजय सरताप यांचा गायन कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांना आजपर्यंत शिवजन्मोत्स कार्यक्रमास संभाजीराजे , कोल्हापूर, मा . खासदार , मा . कोरणेश्वर आप्पा स्वामी लिंगायत धर्मगुरु , कर्नाटक . मा . पांडुरंग गायकवाड , गोविंद गोपाल महार वडू बु.यांचे वंशज . बाळासाहेब देशमुख ज्येष्ठ विधिज्ञ , उच्च न्यायालय मुंबई लाभलेले विविध मान्यवर .आशी माहिती राहुल मखरे यांनी दिली यावेळी,समीर मखरे ,नानासाहेब चव्हाण, प्रकाश पवार, डोनाल्ड शिंदे, सुरज धाईंजे,संतोष क्षिरसागर उपस्थित होते,
टिप्पण्या