इंदापूर:-कु.ओम समीर विंचू हा इंदापूर शहरातील विद्यार्थी असून याने जिल्हास्तरीय धनुर्विद्या रिकर्व गटात उत्कृष्ट कामगिरी करून ब्राँझ पदक जिंकल्याबद्दल त्याचा पतंजली योग समिती इंदापूरजिल्हा पुणे यांच्या वतीने ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी श्री.दत्तात्रेय अनपट म्हणाले की या ब्राँझपदक विजेत्या मुळे नक्कीच इंदापूर शहरातील युवकांसाठी प्रेरणा
मिळण्यासाठी ओमचा निश्चितच उपयोग होईल तसेच त्याच्या घरातील सर्व सदस्य हे पूर्वीपासूनच योग प्राणायाम करीत असल्याने याचा त्यांना फायदाच होत आहे
याप्रसंगी योग समितीचे अध्यक्ष श्री.मदन चव्हाण व महिला पतंजली योग समितीच्या अध्यक्षा सौ.मायाताई विंचू किसान सेवा समितीचे अध्यक्ष श्री.शहाजी बोराटे श्री.नायर अण्णा श्री.भागवत भाऊ गटकुळ यांच्याबरोबर असंख्य महिला व पुरुष बांधव उपस्थित होते
टिप्पण्या