पीपल्स रिपब्लिकन पार्टी ( कवाडे गट) चे वतीने पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भीमानगर जि.सोलापूर येथे रास्ता रोको करणार-संजय सोनवणे इंदापूर : विशेष प्रतिनिधी दि. २१ सप्टेंबर पासून कार्यकारी अभियंता उजनी, यांच्या कार्यालयासमोर सुरु असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाची प्रशासनाकडून अद्याप दखल घेतली नाही. याच्या निषेधार्थ (दि. ३०) रोजी पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भीमानगर जि.सोलापूर येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पक्ष ( कवाडे गटा) चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिली आहे. मौजे रांझणी (ता. माढा जि. सोलापूर ) येथील बौद्ध समाजातील १५० भूमीहीन शेतकऱ्यांच्या मूळ जमिनी ह्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे यांच्याकडे संपादित आहेत. हे शेतकरी उजनी धरणग्रस्त असून त्यांना त्या जमिनीच्या मोबदल्यात कुठलाही शासकीय मोबदला व घर,जमीन मिळाली नाही. त्या मूळ जमिनी सध्या पडीक आहेत. ती जमीन शासनाने त्याच्या उदरनिर्वाहासाठी ह्या शेतकऱ्यांना कसण्यास द्यावी. तसेच प्रशासनाकडून उजनी जलाशय पर्यटन विकास केंद्राच...
SHIVSRUSTHI NEWS