इंदापूरः बायपास पुणे सोलापूर हायवेवर C.N.G.गॅस पंपामुळे हायवेवर गाड्यांची पार्किंग होत आहे आणि त्याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे सरडेवाडी,शहा,महादेवनगर,कांदलगांव, हिंगणगाव, तरटगांव, बाभुळगाव, भिमानगर, रांजणी, आढेगांव, उजनी.यागावातील नागरिकांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मा.संजय भैय्या सोनवणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यापंपामुळे मोटारसायकल वरती पंपामुळे येणे खुप अवघड झाले आहे काही अपघात झालेल्या लोकांनी सुद्धा पंपामुळे आमचा अपघात झाला आहे तुम्ही काही तरी करा अशी विनंती केल्यामुळे मा.संजय भैय्या सोनवणे अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र यांनी 20/9/2021 रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने या पंपामुळे अपघात वाढत आहेत त्या ठिकाणी रोडवरील ट्राफिक जाम करू नये आणि याठिकाणी यापुढे पंपामुळे अपघात झाला तर पंप मालकाला त्यामध्ये सह आरोपी करण्यात यावे. यासाठी आंदोलन करणार असे पत्र दिले त्यानंतर इंदापूर चे कार्यक्षम तहसीलदार मा.श्रीकांत पाटील साहेब यांनी यामध्ये लक्ष घालून इंदापूरचे नुतन पोलिस निरीक्षक मा.तय्युब मुजावर साहेब यांना याबाबतीत काय त्या सुचना केल्या नंतर मुजावर साहेबांनी काल या पंपाच्या ठिकाणी मा.संजय भैय्या सोनवणे यांना आपण त्याठिकाणी या मी पण उपस्थित राहतो पंपमालक पण त्याठिकाणी आहेत आणि आपल्या सुचनेनुसार त्याठिकाणी बदल करू असे सांगितले मग त्याठिकाणी सर्वजण एकत्र आल्यानंतर मा.संजय भैय्या सोनवणे यांनी अनेक जनतेच्या हितासाठी सुचना केल्या मुजावर साहेबांनी पण सुचना केल्या आणि पंपमालकाला त्याठिकाणी बदल करायला सांगितले आणि हे नाही केलं आणि इथे अपघात झाला तर कारवाई करणार हे पण त्यांनी ठणकावून सांगितले पंपाची पार्किंग पाहणी करताना पोलिस निरीक्षक मा.तय्युब मुजावर साहेब, पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मा.संजय भैय्या सोनवणे, पंपमालक व्यवहारे , पोलिस कर्मचारी उपस्थित होते यापुढे बदल नाही केला तर पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने पुणे सोलापूर हायवेवर रास्ता रोको आंदोलन केले जाईल असेही मा.संजय भैय्या सोनवणे यांनी सांगितले.
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या