वृक्षसंवर्धनाची शपथ घेऊन वृक्षारोपण करत वाहिली श्रद्धांजली.
इंदापूर : प्रतिनिधी
रामकृष्ण हरी प्रासादिक दिंडी व अखिल भारतीय मराठी परिषद संलग्न इंदापूर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तरंगवाडी (ता. इंदापूर ) येथील वैकुंठवासी ह.भ.प. मल्हारी रामचंद्र खिलारे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त वारकरी बांधव तसेच उपस्थितांना वृक्षसंवर्धनाची शपथ देऊन वृक्षाचे वाटप करुन श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी ह.भ.प. बोधले महाराज, ह.भ.प.तुकाराम साठे तसेच रामकृष्ण हरी प्रासादिक दिंडीतील पुरुष, महिला वारकऱ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाकरीता इंदापूर येथील शहा नर्सरीच्या वतीने रोपे निशुल्क रोपे पुरविण्यात आली.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी,सदस्य तसेच हरिश्चंद्र खिलारे, अशोक खिलारे, अॅड.संपत कांबळे, लक्ष्मण कांबळे, अॅड.एकनाथ सुगांवकर, सुरेश कांबळे, रोहित कांबळे, ताय्यापा कांबळे, मंगल कांबळे, लता कांबळे, संजय खिलारे, मयुर खिलारे, सुरज खिलारे व ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या