महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येऊच नये,महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा- हर्षवर्धन पाटील
इंदापूर प्रतिनिधी-
भक्तिमय वातावरणात 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' चा जयघोष करीत राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील आपल्या भाग्यश्री निवासस्थानी भक्तीमय, मंत्रमुग्ध, उत्साही वातावरणामध्ये सहकुटुंब गणरायाची प्रतिष्ठापना केली आणि गणरायाला कोरोनाचे संकट निवारण करण्यासाठी साकडे घातले.
संपूर्ण देश आज गणेशाच्या स्वागतासाठी उत्साही आहे. घरोघरी आज गणरायाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी दरवर्षी मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत करून प्रतिष्ठापना केली जाते. याहीवर्षी अत्यंत आनंदाने, भक्तिमय वातावरणात संपूर्ण कुटुंबाने गणरायाचा जयघोष करीत गणपती प्रतिष्ठापना केली.गणरायाच्या प्राणप्रतिष्ठा वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील, कन्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, मुलगा निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये तसेच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा. राज्यातील सर्व नागरिकांना सुखाने व आनंदाने जीवन जगता यावे असे गणराया चरणी त्यांनी साकडे घातले व गणेश उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या