दि. 2 सप्टेंबर 2021रोजी इंदापूर महाविद्यालयामध्ये वीर मराठी प्रोडक्शन च्या ‘कपाळ’ या वेबसिरीजचा शुभ मुहूर्त प्रा डॉ जयश्री गटकुळ यांच्या हस्ते झाला, वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित तसेच उपेक्षित घटकावर प्रकाश टाकला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत मखरे यांनी केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कुमार शिंदे यांनी केले *वेबसिरीज ही स्क्रिप्टेड किंवा नॉन-स्क्रिप्टेड ऑनलाईन व्हिडिओंची मालिका आहे,
साधारणपणे एपिसोडिक स्वरूपात, इंटरनेटवर रिलीज झाली, जी प्रथम 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात उदयास आली सद्या युवा पिढी वेबसेरीजच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे, संघर्षातून वाट काढणारे ग्रामीण युवा कलाकार अभिनय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतील,उमद्या कलाकारानी दिव्य स्वप्न उराशी बाळगून आर्थिक, सामाजिक स्तरावर संघर्ष करणाऱ्या युवकाचा जीवनपट रुपेरी पडद्यावर आणून आजच्या आधुनिक काळातील युवकांना आत्मविश्वास आणि प्रेरणा देऊन अडचणी, संकटावर मात करण्याचा संदेश दिला आहे* असे मत व्यक्त करून युवा कलाकरानी भवितव्य घडविण्यासाठी शुभेच्छा देऊन वेबसिरीज प्रोडक्शन साठी सहकार्य करण्याचे आश्वासन जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्षा प्रा डॉ जयश्री भास्कर गटकुळ यांनी युवा कलाकारांना दिले. कार्यक्रमाचे आभार सुप्रिया खाडे यांनी मानले.
कपाळ वेबसेरिज शुभ मुहूर्त कार्यक्रमासाठी वीर मराठी प्रोडक्शनचे सर्व कलाकार टीम संतोष नरुटे, रोहित शिंदे, राहुल बिबे, रेणुका राऊत, गणेश चव्हाण, नीरज सबनीस,अभिजित चव्हाण, योगीराज भिसे, वैष्णवी मोरे, हेमंत खिगारे अन्य कलाकार उपस्थित होते.
टिप्पण्या