इंदापूरः- शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आयोजित मेळावा महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिपदादा गारटकर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक अध्यक्ष महेबूबभाई शेख, कार्याध्यक्ष रविकांतजी वरपे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनेक वरिष्ठ नेते मंडळी आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शहा संस्कृतिक भवन इंदापूर येथे पार पडला या मेळाव्यात इंदापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून इम्रानभाई शेख यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक इंदापूर शहर अध्यक्ष म्हणून अहेमदरजा सय्यद यांची निवड करण्यात आली इम्रानभाई शेख यांना तसेच अहेमदरजा सय्यद यांना पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिपदादा गारटकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत आबा कोकाटे इंदापूर तालुका राष्ट्रवादी अल्पसंख्याक अध्यक्ष इकबालभाई शेख यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले! यावेळी माध्यमांशी बोलताना युवकचे अध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, आपल्या भागाच्या संसदरत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आदरणीय दत्तामामा भरणे, यांचे विचार संपूर्ण इंदापूर शहरातील सर्व समाजात समाजातील तळागाळात पर्यंतच्या व्यक्तीपर्यंत राष्ट्रवादीचा विचार आदरणीय पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहोचण्याचा निर्धार बोलून दाखवला! तसेच अल्पसंख्यांकांचे इंदापूर शहराध्यक्ष अहेमदरजा सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आपल्या भागाच्या संसदरत्न खासदार आदरणीय सौ सुप्रिया ताई सुळे यांचे अल्पसंख्यांक समाजा विषयी असणारे विचार इंदापूर शहरातील समाजाच्या तळागाळाच्या, शेवटच्या व्यक्तीपर्यंत, पोहोचण्याचा निर्धार बोलून दाखवला तसेच जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिपदादा गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण वेळ कार्यरत राहण्याचा तसेच समाजातील लहान-मोठे प्रश्न आदरणीय दादांच्या निदर्शनास आणून त्याचा पाठपुरावा करून समाजाच्या प्रत्येक घटकाला त्या प्रवाहात आणण्यासाठी त्यासाठी वेळोवेळी,प्रदिपदादाच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा अल्पसंख्यांकांचे अध्यक्ष आदरणीय हाजी सोहेलभाई शेख, विठ्ठल (आप्पा) ननवरे माजी नगराध्यक्ष इंदापूर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्यांक इंदापूर तालुकाध्यक्ष इकबालभाई शेख यांचे सहकार्य घेऊन दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले!
इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वहात होता. बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...
टिप्पण्या