लासुर्णे येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत
बहुजन मुक्ती पार्टी चा कार्यकर्ता मेळावा-अॅड,राहूल मखरे
इंदापूर :-बहुजन मुक्ती पार्टी चा कार्यकर्ता मेळावा दि. 05 सप्टेंबर 2021 रोजी लासुर्णे येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी अध्यक्षीय भाषण करताना अॅड. राहुलजी मखरे यांनी काँग्रेस, भाजप व तत्सम पक्षातून निवडून गेलेले प्रतिनिधी हे समाजाच्या मतावर निवडून गेले असले तरी ते समाजाच्या हितासाठी काम करत नाहीत. कारण त्यांना पक्षाने तिकीट दिलेले असते. पक्षाचे अजेंडे समाजविरोधी आहेत हे माहीत असले तरी ते पक्षाचे विरोधात जाऊन समाजहिताचे निर्णय घेऊ शकत नाहीत.
कारण पुढील निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारली जाईल अशी भीती असते. पक्ष जे सांगेल ते काम सालाने ठेवलेल्या गड्यासारखे करायचे,एवढीच त्यांची भूमिका असते. परंतु, बहुजन मुक्ती पार्टीची सत्ता आल्यावर समाजाच्या समस्या सोडविण्याचे, समाजाच्या हिताचे बोलण्याचा आणि समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य लोकप्रतिनिधींना देण्यात येईल. कारण आम्ही पक्षाचे समर्थक नाही, आम्ही जनतेचे समर्थक आहोत. त्यामुळे आमच्या पक्षाचे ब्रीद "जनतेची... जनतेद्वारा... जनतेसाठी" असे आहे, असे ते म्हणाले.
बहुजन मुक्ती पार्टी चे प्रदेशाध्यक्ष मा. श्रीकांत दादा होवाळ साहेब ओबीसी आरक्षणावर बोलताना म्हणाले की, काँग्रेस आणि भाजप हे ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात आहे. जर त्यांना आरक्षण द्यायचे असते तर यापुर्वीच दिले असते. परंतु, हे ओबीसींना आरक्षण विषयी चुकीची माहिती देऊन त्यांच्या मधे आरक्षण विषयी गैरसमज पसरवत आहेत.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे लोकसभा प्रतिनिधि महाराष्ट्राच्या बाहेर नाहीत, शिवसेनेचे नाहीत. त्यामुळे संसदेत यांचा प्रभाव पडत नाही. पुरोगामीत्वाची कातडी पांघरूण बहुजन समाजाला फसवण्याचे काम या पक्षांकडून होत आहे. बहुजन मुक्ती पार्टीची देशात सत्ता आली तर लोकसंख्येच्या प्रमाणात 100% आरक्षण लागू करण्यात येईल. असेही ते म्हणाले.
यावेळी मा. अमोल लोंढे (अध्यक्ष - बीएमपी युवा आघाडी बीएमपी पश्चिम महाराष्ट्र), तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग, युवा अध्यक्ष मा. राहुल शिंगाडे. काजल उकिरडे महिला आघाडीच्या अध्यक्षा, पोपट आठवले (कार्याध्यक्ष - बीएमपी), संतोष क्षीरसागर (शहराध्यक्ष) संतोष कांबळे, विष्णु आप्पा चव्हाण, नेताजी लोंढे, संजय डोनाल्ड शिंदे, बहुजन मुक्ती पार्टी चे हजारों कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बहुजन समाज पार्टी चे मा. तालुकाध्यक्ष महेश लोंढे आणि पीआरपीचे कळसचे कार्यकर्ते मा. अतुल कांबळे यांनी बहुजन मुक्ती पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
टिप्पण्या