गौराई पूजन म्हणजे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान*- प्रा.डाॅ.जयश्री गटकुळ
इंदापूर: गौराई पूजन निमित्त गौराईच्या स्वरूपात जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्यामाई, मुक्ताई, फातीमाबी आणि आधुनिक काळातील कर्तृत्ववान महिला या महान नारीशक्तीचे दर्शन घडत आहे, गौराई पूजन निमित्त महान नारीशक्तीच्या कर्तुत्वाची आठवण करून देण्यासाठी पुस्तकांचे पूजन केले. आमचा परिवार हा वैचारिक - सामाजिक परिवर्तन विचारांचा आहे आणि येणाऱ्या काळात पुस्तक हेच शस्त्र असेल, विचार व कृती म्हणजेच वैचारिक परिवर्तन..... परिवर्तन घडवायचे असेल तर स्वतःच्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे म्हणूनच आम्ही पुस्तक पुजन केले.... शिक्षणातून, वाचनातून, वैचारिक परिवर्तनातूनच आयुष्य उज्ज्वल होते. वैचारीक दृष्टीकोनाने मार्गक्रमण करीत असेल तर जीवनात सुख समृध्दी, यश लाभेल.
आजच्या आधुनिक काळातील सर्व कर्तृत्ववान महिला गौरी आहेत... गौराई पूजन म्हणजे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आहे... आजच्या काळात महिला असुरक्षित आहेत... महिलांचा आदर करा.. महिलांना सन्मान द्या. महिलेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी... महिलेवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी प्रशासन पातळीवर निर्णय घेणे गरजेचे आहे. असे मत जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष प्रा डॉ जयश्री भास्कर गटकुळ यांनी व्यक्त केले.
टिप्पण्या