इंदापुरात शाळकरी मुलांची कोंबडीसारखी कोंबाकोंब; एकाच खोलीत ६ मुले डांबून घरमालकांकडून चढ्या दराने भाडेवसुलीचा काळा धंदा..!
इंदापूर शहरात शिक्षणासाठी आलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांची स्थानिक घरमालकांकडून आर्थिक आणि मानसिक पिळवणूक सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शहरात एका छोट्याशा खोलीत क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे तब्बल ५ ते ६ मुलांना डांबून, त्यांच्याकडून अवाजवी आणि चढ्या दराने भाडे वसूल करण्याचा बेकायदेशीर धंदा जोरात सुरू आहे. प्रशासनाच्या डोळ्यांदेखत सुरू असलेल्या या गोरखधंद्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भवितव्य धोक्यात आले आहे.
- क्षमता २ लोकांची, राहतात ६ मुले: अत्यंत छोट्या खोल्यांमध्ये ५ ते ६ शाळकरी मुलांना एकत्र राहावे लागत आहे.
: खोलीत पाय ठेवायला जागा नसल्याने मुलांना बळजबरीने गादीवर किंवा कोपऱ्यात बसून अभ्यास करावा लागतो. - पाणी आणि आरोग्याचा प्रश्न: एकाच स्वच्छतागृहावर ६ मुले अवलंबून असल्याने अस्वच्छता पसरून आजारपण वाढत आहे.
- मजबुरीचा गैरफायदा: ग्रामीण भागातून इंदापूर शहरात नामांकित शाळा-कॉलेजमध्ये शिकायला आलेल्या मुलांच्या हतबलतेचा घरमालक गैरफायदा घेत आहेत.
बेकायदेशीर भाडेवसुलीचा आकडा थक्क करणारा
मिळालेल्या माहितीनुसार, घरमालक संपूर्ण रूमचे भाडे न ठरवता 'पर हेड' (प्रत्येक मुलामागे) १ ते २ हजार रुपये वसूल करत आहेत. म्हणजेच, एका १० बाय १० च्या खोलीतून घरमालक महिना १० ते १५ हजार रुपये कमावत आहेत. कोणत्याही सोयीसुविधा न देता शाळकरी मुलांच्या जिवावर चाललेली ही उघड लूट आहे. मोठ मोठ्या उंच इमारती बांधून फक्त मुलेच भाडे करू भरतात व भरपूर पैसा मिळवत आहेत,यांना कोणाचीच भिती नाही बापाची जहागिरी आपल्या सारखे हे भामटे वागतात,काही गोरगरीब भाडेकरूंना दमदाटी करून जास्त भाडे आकरणे व वसूल करणे, नाहीतर रूम खाली करा,गोरगरीबवभोळीलोक,भीतात आणि पैसेदेतात, कुठे फेडणारहे भाडं खाऊ पापं, आशा ना-लायकांनी धंदाच मांडलाय
कायद्याचा बडगा; घरमालकांनो सावधान!
या गंभीर प्रकारावर इंदापूर पोलीस आणि नगरपरिषद प्रशासन कडक कायदेशीर कारवाई करू शकते: - महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम, १९९९: निवासी जागेचा गैरवापर करून अवाजवी भाडे वसूल करणे हा गंभीर गुन्हा आहे.
इंदापूर शहरातील घर मालक चालू भाडेकरू लोकांना काढून नविन शाळकरी मुलांना कोणताही करार न करता रूम भाड्याने देतात, - पोलीस पडताळणी (Police Verification) शून्य: अनेक घरमालकांनी भाड्याने राहणाऱ्या मुलांची कोणतीही नोंद स्थानिक इंदापूर पोलीस ठाण्यात केलेली नाही. हा भारतीय न्याय संहिता (BJS) अंतर्गत कायदेशीर गुन्हा आहे.
- कमर्शियल टॅक्सची चोरी: निवासी घराचा वापर खाजगी हॉस्टेल किंवा पेइंग गेस्ट सारखा करून घरमालक, नगरपरिषदेचा व्यावसायिक कर बुडवत आहेत.
इंदापूर प्रशासन ढिम्म; पालकांमध्ये संताप
"आम्ही मुलांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना इंदापुरात पाठवले, पण इथे त्यांची जनावरांसारखी कोंबाकोंब केली जात आहे. तक्रार केली तर मुलांना खोलीवरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते," असा उद्वेग एका पालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केला. या गंभीर प्रकरणावर इंदापूरचे तहसीलदार, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कधी कारवाई करणार..? हाच मोठा प्रश्न आहे...
टिप्पण्या