हिंगणगावात डाळिंब चोरीची घटना; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण,विद्युत वितरण कंपनी च्या ना - लायक पणा मुळे शेतकरी अडचणीत
इंदापूर:हिंगणगाव येथील शेतकरी देवकर यांच्या शेतातील विक्रीसाठी तयार असलेल्या डाळिंब पिकाची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. सोन्यासारखे जपलेले पीक काही क्षणांत लंपास झाल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला असून परिसरातील डाळिंब उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी रात्री साधारण साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान झाली. शेतात राखण असतानाही चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत धूळफेक करत डाळिंबाचा माल लंपास केला. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शेतीसाठी आवश्यक असलेला वीजपुरवठा वेळेवर मिळत नसल्याने रात्री शेत परिसरात अंधाराचे वातावरण असते. याच परिस्थितीचा फायदा चोरटे घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. तसेच डाळिंब पिकासाठी कोणत्याही प्रकारचे प्रभावी विमा संरक्षण उपलब्ध नसल्याने चोरी किंवा नैसर्गिक संकटांचा संपूर्ण आर्थिक भार शेतकऱ्यांवरच पडत आहे.
हिंगणगाव परिसरात सुमारे २०० एकरांहून अधिक क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करण्यात आली असून, सध्या गावात १०० टनांपेक्षा अधिक डाळिंब विक्रीसाठी तयार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत तयार झालेल्या मालाचे संरक्षण कसे करायचे, हा प्रश्न डाळिंब उत्पादकांसमोर उभा राहिला आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, शेतमाल चोरी रोखण्यासाठी रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, नियमित वीजपुरवठा करावा तसेच डाळिंब उत्पादकांना प्रभावी विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी हिंगणगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव तरडगाव हे गाव पुणे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाची गावे असल्यामुळे विद्युत वितरण कंपनी याकडे अजिबात लक्ष देत नाही कायमस्वरूपी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत दररोज लाईट घालवले जाते जनतेला नाहक त्रास देणाऱ्या ना - लायक आणि भामट्या विद्युत वितरण कंपनीवर कारवाई करावी एकीकडे ऊर्जामंत्री लोड शेडिंग नाही म्हणतात आणि दुसरीकडे एमएसईबीचे अधिकारी लोड शेडिंग रात्रभर लाईट घालवतात अशी सामान्य जनतेची चर्चा आहे अंधाराचा फायदा घेत लाखो रुपयांच्या नुकसान लोकांचे होत आहे चोरांचे प्रमाण वाढले असून महावितरण वर खरी कारवाई करणे गरजेचे आहे,आशी जनतेत चर्चा
टिप्पण्या